जेएनयूमध्ये विद्यार्थी विवस्त्र नृत्य करतात - ग्यानदेव अहुजा
By Admin | Updated: February 23, 2016 14:41 IST2016-02-23T14:37:02+5:302016-02-23T14:41:38+5:30
जेएनयू देशद्रोह्यांचा अड्डा बनले असून इथे रात्री आठ वाजल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नावाखाली विद्यार्थ्यांचे विवस्त्र नृत्य चालते.

जेएनयूमध्ये विद्यार्थी विवस्त्र नृत्य करतात - ग्यानदेव अहुजा
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २३ - जवाहरलाल नेहरु विद्यापीठ आपली चमक घालवून बसले आहे. हे विद्यापीठ आता देशद्रोह्यांचा अड्डा बनले असून इथे रात्री आठ वाजल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नावाखाली विद्यार्थ्यांचे विवस्त्र नृत्य चालते.
राजस्थानचे भाजप आमदार ग्यानदेव अहुजा यांनी ही धक्कादायक विधाने केली आहेत. अहुजा एवढयावरच थांबलेले नाहीत तर, जेएनयूच्या आवारात रोज ३ हजार कंडोम्स आणि गर्भधारण विरोधी इंजेक्शन्स वापरली जातात असे गंभीर आरोप केले आहेत.
जेएनयूच्या आवारात तुम्हाला दररोज तीन हजार बिअर कॅन, दहा हजार सिगारेटस, चार हजार बिडीचे तुकडे आणि ५० हजार हाडांचे तुकडे पडलेले असतात असा दावा ग्यानदेव अहुजा यांनी केला.