विद्यार्थी संघ बनले हायस्यास्पद
By Admin | Updated: February 14, 2015 23:52 IST2015-02-14T23:52:13+5:302015-02-14T23:52:13+5:30
निवडणुकीच्या सहा महिन्यानंतर पदग्रहण

विद्यार्थी संघ बनले हायस्यास्पद
न वडणुकीच्या सहा महिन्यानंतर पदग्रहण : एप्रिलमध्ये संपणार कार्यकाळ नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाचा पदग्रहण सोहळ्याचा मुहूर्त अखेर निघाला आहे. निवडणुका होऊन सहा महिने लोटल्यावर १६ फेब्रुवारी रोजी पदग्रहणाचा मुहूर्त शोधण्यात आला आहे. विद्यार्थी कल्याण निदेशक कार्यालयाने शनिवारी यासंबंधात अधिसूचना काढली आहे. विशेष म्हणजे विद्यार्थी संघाचा कार्यकाळ संपायला आता केवळ दीड महिनाच शिल्लक राहिला असताना पदग्रहण समारंभ आयोजित करण्यात आला असल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. नियमानुसार विद्यार्थी संघाच्या निवडणुका पार पडल्यावर आठवडाभरात पदग्रहण होणे आवश्यक आहे. परंतु विद्यार्थी संघाची निवडणूक जिंकणारे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी) आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या नेत्यांनी याकडे लक्षच दिले नाही. पदग्रहण समारंभात एबीव्हीपीने आपले प्रदेशमंत्री शुभंगी नक्षिणे यांना तर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने प्रदेश उपाध्यक्ष सलील देशमुख यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित केले आहे. विद्यार्थी संघटना व विद्यार्थी संघाचे अध्यक्ष व सचिव यांच्या भूमिकेवरही तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्यांचा आवाज मानल्या जाणाऱ्या विद्यार्थी संघाला नेत्यांनी हास्यास्पद करून ठेवले असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.