शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्याची हत्या; पालकांच्या आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, पोलिसांचा लाठीमार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 01:51 IST

रायन इंटरनॅशनल स्कूलमधील ७ वर्षीय मुलाची हत्या झाल्यानंतर, संतप्त पालक रविवारी रस्त्यावर उतरले. पालकांसह शेकडो नागरिकांनी शाळेसमोर आंदोलन करत सीबीआय चौकशीची मागणी केली. शाळेजवळील दारूच्या दुकानाला या जमावाने आग लावली. त्यानंतर, पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी लाठीमार केला.

गुरुग्राम : येथील रायन इंटरनॅशनल स्कूलमधील ७ वर्षीय मुलाची हत्या झाल्यानंतर, संतप्त पालक रविवारी रस्त्यावर उतरले. पालकांसह शेकडो नागरिकांनी शाळेसमोर आंदोलन करत सीबीआय चौकशीची मागणी केली. शाळेजवळील दारूच्या दुकानाला या जमावाने आग लावली. त्यानंतर, पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी लाठीमार केला.या आंदोलनाच्या वेळी काही छायाचित्रकारांच्या कॅमेºयाचे नुकसान झाले. पोलिसांनी सांगितले की, काही आंदोलकांनी शाळेच्या व्यवस्थापनाविरुद्ध आपला राग व्यक्त करत, शाळेच्या परिसरात दारूच्या बाटल्या फेकल्या. दारूचे दुकान शाळेपासून अवघ्या ५० मीटर अंतरावर आहे. जोपर्यंत सीबीआय चौकशी जाहीर होत नाही, तोपर्यंत शाळा बंद ठेवण्याची मागणी पालक करत होते.गुरुग्राम पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी रविंदर कुमार यांनी सांगितले की, आंदोलकांना पांगविण्यासाठी हलका लाठीमार करण्यात आला, तर २० हून अधिक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले आहे. आंदोलकांनी असा आरोप केला की, रिकाम्या वेळेत शाळेचे चालक आणि कंडक्टर कधी कधी दारू दुकानातून दारू घेऊन पितात.शाळेची मान्यता रद्द होऊ शकत नाहीहरयाणा सरकारने स्पष्ट केले आहे की, शाळा व्यवस्थापन व मालकाविरुद्ध ‘पॉस्को’ कायद्याखाली गुन्हा नोंदविला आहे. पालक समाधानी नसतील, तर तपास सीबीआयकडेही देण्याची आमची तयारी आहे. राज्याचे शालेश शिक्षणमंत्री राम बिलास शर्मा म्हणाले की, शाळा व्यवस्थापनाकडून निष्काळजीपणा झाला आहे. शाळेची मान्यता रद्द केली जाऊ शकत नाही. कारण १२०० विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे.काय आहे प्रकरण?गत शुक्रवारी रायन इंटरनॅशनल स्कूलच्या शौचालयात प्रद्युम्न ठाकूर या विद्यार्थ्याचा गळा कापलेला मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर, पालकांमधून संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी या प्रकरणात बस कंडक्टर अशोककुमार याला ताब्यात घेतले आहे. 

टॅग्स :Indiaभारतcrimeगुन्हे