बसमधून पडल्याने विद्यार्थिनी जखमी : आळेफाटा घटना
By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:38+5:302015-02-14T23:51:38+5:30
आळेफाटा : नगर-कल्याण महामार्गावर आळे बसस्थानक येथे आज दुपारी एकच्या सुमारास एसटी बसमध्ये चढत असलेली येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनी बस चालू झाल्याने खाली पडून चाकाखाली पाय आल्याने झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाली.

बसमधून पडल्याने विद्यार्थिनी जखमी : आळेफाटा घटना
आ ेफाटा : नगर-कल्याण महामार्गावर आळे बसस्थानक येथे आज दुपारी एकच्या सुमारास एसटी बसमध्ये चढत असलेली येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनी बस चालू झाल्याने खाली पडून चाकाखाली पाय आल्याने झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाली. आळेफाटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आळे येथील बाळासाहेब जाधव महाविद्यालयात शिक्षण घेत असलेली राजुरी येथील दीपाली अशोक पावडे (वय १९) महाविद्यालय सुटल्यानंतर आज दुपारनंतर एकच्या सुमारास घरी जाण्याकरिता आळे बसस्थानकावर एसटी बसची वाट पाहत होती. तेथे शिरूर आगाराची आळेफाटा-शिरूर ही एसटी बस (एमएच २०-डी ८०३१) आली. इतर महाविद्यालयीन विद्यार्थिनींबरोबर दीपालीही या बसमध्ये चढत असताना चालकाने निष्काळजीपणाने एसटी बस सुरू केल्याने दीपालीचा तोल जाऊन ती खाली पडली. तिचा डावा पाय बसच्या मागील चाकाखाली आल्याने ती या वेळी गंभीर जखमी झाली. उपचारांसाठी आळेफाटा येथे तिला दाखल करण्यात आले. आळे येथून एसटी बसने प्रवास करताना अपुर्या एसटी बस व विद्यार्थी जास्त यामुळे ते त्रस्त झाले आहेत. त्वरित महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सोयीकरिता ज्यादा बस सुरू करण्याची मागणी या संस्थेचे अध्यक्ष किशोर कुर्हाडे, उपाध्यक्ष बी. आर. सहाणे संचालक प्रसन्न डोके यांनी केली आहे. दरम्यान, आळेफाटा पोलीस ठाण्यात एसटीचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील तपास करीत आहेत. फोटो : आळेफाटा येथे उपचार घेत असलेली बस अपघातातील जखमी महाविद्यालयीन विद्यार्थिनी.