शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

भुवनेश्वरमध्ये विद्यार्थीनीच आत्महत्या; विद्यापीठाने जबरदस्तीने विद्यार्थ्यांना पाठवले नेपाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 20:00 IST

भुवनेश्वर येथील एका खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थिनीने आत्महत्या केल्यानंतर तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे.

KIIT University Suicide Case: ओडिशातील भुवनेश्वर येथील कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी विद्यापीठात गोंधळ सुरू आहे.  मुलींच्या वसतिगृहात बीटेकच्या तृतीय वर्षाच्या एका विद्यार्थिनीने रविवारी सायंकाळी आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेनंतर काही तासांनी विद्यापीठाने सर्व नेपाळी विद्यार्थ्यांना तातडीने कॅम्पस रिकामे करण्याचे आदेश दिले. नेपाळी विद्यार्थ्यांना घाईघाईने सामान भरून तिकिटांशिवाय बस आणि ट्रेनमध्ये पाठवण्यात आले. विद्यापीठाच्या या कृतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ओडिशातील कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी महाविद्यालयातील बी.टेकच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थिनीने तिच्या वसतिगृहात आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. प्रकृती लमसाल असे नेपाळमधील विद्यार्थिनीचे नाव आहे. दुसरीकडे विद्यापीठाने नोटीस बजावत नेपाळमधील सर्व विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आल्याचे म्हटलं. नेपाळमधील सर्व विद्यार्थ्यांना १७ फेब्रुवारी रोजी वसतिगृहे तातडीने रिकामी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानंतर नेपाळी विद्यार्थ्यांना घाईघाईने त्यांचे सामान बांधण्यास भाग पाडले आणि त्यांना विद्यापीठाच्या बसमधून कटक रेल्वे स्थानकावर जबरदस्तीने पाठवण्यात आले.

त्यानंतर नेपाळी विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनावर हे प्रकरण दडपल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाच्या  तपासात पारदर्शकता आणावी अशी त्यांची मागणी आहे. दुसरीकडे, आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीच्या मित्रांनी आरोप केला की, तिचा माजी प्रियकर अद्विक श्रीवास्तवच्या छळामुळे तिने हे पाऊल उचलले. विद्यार्थिनीच्या भावानेही पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

भुवनेश्वरचे पोलिस उपायुक्त पिनाक मिश्रा म्हणाले की, एका विद्यार्थीनीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आम्ही इन्फोसिटी पोलीस ठाण्यात विद्यार्थ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात असून त्याची चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांनी विद्यार्थ्याचा मोबाईल फोन, लॅपटॉप आणि इतर गॅजेट्स जप्त केले आहेत. आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत."

दरम्यान, तणावामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थीनीने विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय संबंध विभागाकडे मदत मागितली होती. परंतु कोणतीही मदत मिळाली नाही, असा आरोपही अनेक विद्यार्थ्यांनी केला आहे. मानसिक दबावामुळे तिने हे आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे सहकारी विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. या घटनेनंतर विद्यापीठात प्रचंड निदर्शने सुरू झाली असून विद्यार्थ्यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.

टॅग्स :Odishaओदिशाuniversityविद्यापीठCrime Newsगुन्हेगारीNepalनेपाळ