शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

विद्यार्थिनीच्या विनयभंगप्रकरणी शिक्षकास अटक संतप्त जमावाने मोटारसायकल जाळली : आपोती खुर्द येथील घटना

By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST

आपातापा / बोरगाव मंजू : आपोती खुर्द येथील कर्मयोगी बाबासाहेब आपोतीकर विद्यालयातील एका शिक्षकाने शाळेतील एका विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी बोरगाव मंजू पोलिसांनी त्याच्याविरुद्ध शनिवार, १४ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी संतप्त जमावाने शिक्षकाची मोटारसायकल जाळून टाकल्याची घटना शनिवारी दुपारी घडली.

आपातापा / बोरगाव मंजू : आपोती खुर्द येथील कर्मयोगी बाबासाहेब आपोतीकर विद्यालयातील एका शिक्षकाने शाळेतील एका विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी बोरगाव मंजू पोलिसांनी त्याच्याविरुद्ध शनिवार, १४ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी संतप्त जमावाने शिक्षकाची मोटारसायकल जाळून टाकल्याची घटना शनिवारी दुपारी घडली.
या घटनेबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, आपोती खुर्द येथील उपरोल्लेखित विद्यालयातील संजय गोपनारायण या शिक्षकाने शुक्रवार, १३ फेब्रुवारी रोजी शाळेत शिकत असलेल्या सुलतानपूर बेंदरखेड येथील एका विद्यार्थिनीस मध्यान्हातील सुटीत प्रयोगशाळेतील कपाट पुसण्याच्या बहाण्याने वर्गातून नेले. तेथे तिच्याशी लगट करून तिचा विनयभंग केला. यावेळी, मुलीने त्याच्या तावडीतून सुटका करून घेतली व पळ काढला. तिने हा प्रकार घरी गेल्यावर वडिलांना सांगितला. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या वडिलांनी शनिवारी सकाळी १० वाजता शाळा गाठून हा गंभीर प्रकार शाळा व्यवस्थापनाच्या लक्षात आणून दिला व शिक्षकाला समज देण्याची मागणी केली. दरम्यान, या घटनेची माहिती वार्‍यासारखी पसरून जनक्षोभ उसळला. या घटनेमुळे हा शिक्षक पळून जाण्याच्या तयारीत होता; परंतु, शाळा परिसरात जमलेल्या संतप्त जमावाला पाहून शिक्षकाने तेथील कार्यालयात स्वत:ला कोंडून घेतले. यामुळे अधिकच संतप्त झालेल्या जमावाने शाळेच्या आवारात उभी असलेली शिक्षकाची मोटारसायकल पेटवून दिली. या घटनेची माहिती कळताच बोरगाव मंजूचे ठाणेदार डी.के.आव्हाळ यांनी एएसआय शकील कुरेशी, रमेश बलखंडे, अरुण गावंडे, विलास जामनिक, प्रकाश पिंजरकर, गवळी आदी पोलीस कर्मचार्‍यांच्या ताफ्यासह घटनास्थळ गाठले. त्यानंतर परिस्थितीवर नियंत्रण मिळवून पीडित विद्यार्थिनीच्या फिर्यादीवरून आरोपी संजय गोपनारायण याच्याविरुद्ध कलम भादंवि ३५४ व लैंगिक शोषण अपराध बालहक्क संरक्षण कायदा २०१२ च्या कलम ८ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार आव्हाळे हे करीत आहेत. (वार्ताहर)
फोटो क्रमांक : १५ सीटीसीएल ०५ कॅप्शन : विद्यार्थिनीच्या विनयभंगामुळे १४ फेब्रुवारी रोजी संतप्त जमावाने पेटविलेली शिक्षकाची मोटारसायकल.
१५सीटीसीएल २३ : शाळेत जमलेला संतप्त जमाव.
०००००००००००००००००००००००००