शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

मी तुझा गुरू असतो तर तुला पत्रकार बनण्याचा सल्ला दिला असता, विद्यार्थ्याच्या प्रश्नावर मोदींचं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2018 15:55 IST

'जर मी तुझा गुरू असतो तर तुला पत्रकार बनण्याचा सल्ला दिला असता.

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या तालकटोरा स्टेडिअममध्ये 'परीक्षा पर चर्चा' या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. मोदींनी विद्यार्थ्यांना परीक्षेच्यावेळी तणावमुक्त कसे राहाल, याबद्दल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींना एका अकरावीच्या विद्यार्थ्याने प्रश्न विचारला. त्या विद्यार्थ्याचा प्रश्न व त्या प्रश्नावर मोदींनी दिलेलं उत्तर सध्या चर्चेचा विषय आहे. 

अकरावीच्या विद्यार्थ्याने मोदींना विचारलं की, पुढील वर्षी (2019मध्ये) माझी बोर्डाची परीक्षा आहे आणि पुढील वर्षीच लोकसभेच्या निवडणुका आहेत. त्यासाठी तुमची तयारी कशी सुरू आहे? विद्यार्थ्याच्या या प्रश्नावर नरेंद्र मोदींनी हसून उत्तर दिलं. 'जर मी तुझा गुरू असतो तर तुला पत्रकार बनण्याचा सल्ला दिला असता. कारण पत्रकारच असे प्रश्न फिरवून विचारू शकतात. मोदी म्हणाले, निवडणूक असो वा परीक्षा दोन्ही वेळी वेळेचा पुरेपुर उपयोग करा, तुम्ही शक्ती भरपूर वापरा. परीक्षा वर्षातून एकदाच येते. तुला बोर्डाच्या परीक्षेसाठी शुभेच्छा! माझ्याबरोबर सव्वाशे कोटी लोकांचे आशिर्वाद आहेत. माझ्यासाठी तिच ताकद आहे, असं उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं. 

आत्मविश्वास म्हणजे बाजारात विकत मिळणारे औषध नव्हे- नरेंद्र मोदीआत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली आहे. मात्र, तो कोणत्याही बाजारात विकत मिळत नाही, असा कानमंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील विद्यार्थ्यांना दिला. ते शुक्रवारी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी देशभरातील विद्यार्थ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारले. यावेळी मोदींनी विद्यार्थ्यांना परीक्षेच्यावेळी तणावमुक्त कसे राहाल, याबद्दल मार्गदर्शन केलं. मी आज तुमच्याशी पंतप्रधान म्हणून नव्हे तर एक मित्र म्हणून बोलत आहे. आज तुम्ही माझी परीक्षा घेणार आहात आणि मला गुण देणार आहात. आयुष्यात स्वत:मधला विद्यार्थी कधीच मरून देऊ नका, त्यामुळे माणसाला जगण्याची ताकद मिळते, असे सांगत मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. विद्यार्थी एरवी विद्येची देवता असणाऱ्या सरस्वतीची उपासना करतात. मात्र, परीक्षांच्या काळात विद्यार्थ्यांनी हनुमानाची उपासना करावी, असे मोदींनी सांगितलं.   

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीStudentविद्यार्थी