घरातील तरत्या वस्तूंनी बुडत्यांना तारले

By Admin | Updated: September 17, 2014 03:14 IST2014-09-17T03:14:29+5:302014-09-17T03:14:29+5:30

जम्मू-काश्मिरात शतकातील सर्वात मोठय़ा पुराने अनेकांचे सर्वस्व हिरावून नेले. कुणाचे आप्तगण काळाच्या पोटात गडप झाले.

Stuck in the house with the big things | घरातील तरत्या वस्तूंनी बुडत्यांना तारले

घरातील तरत्या वस्तूंनी बुडत्यांना तारले

श्रीनगर : जम्मू-काश्मिरात शतकातील सर्वात मोठय़ा पुराने अनेकांचे सर्वस्व हिरावून नेले. कुणाचे आप्तगण काळाच्या पोटात गडप झाले. घरातील होते नव्हते सर्व काही वाहून गेले. घरांचे अवशेषही दिसेनासे झाले. पुराच्या थैमानाने विध्वंसाच्या खुणा तेवढय़ा उरल्या आहेत.  पण अनेकांसाठी घरातील टाकाऊ म्हणवणा:या वस्तू अक्षरश: बुडत्यांचा आधार ठरल्या.
बुडत्यांनी अखेरचा इलाज म्हणून थर्माकोलच्या शीट, हवा भरलेले बेड, पाणी साठवण्याच्या टाक्या अशा वस्तूंचा आधार घेत स्वत:ला आणि इतरांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. नशीब बलवत्तर म्हणा की वेळीच साधलेला क्षण म्हणा, या लोकांनी अशा तरंगत्या वस्तूंना कवटाळले नसते तर कदाचित त्यांना पुढचा दिवस दिसलाच नसता. 
बेमिनामधील गुलाम कादीर लोन यांनी पाणी साठवण्याच्या टाकीचा आधार घेत स्वत:चे कुटुंबच नव्हे, तर शेजारच्या सात कुटुंबातील 26 जणांचे प्राण वाचविले. आता वाचलो, जिंदगानी नव्याने हिमतीने उभी करण्याची दुर्दम्य आशा त्यांच्या बोलण्यातून झळकली. लोन यांचे दुमजली घर होते. 
पाण्याची पातळी वाढत असताना घरातील सर्व जण जिवाच्या आकांताने ओरडत होते. त्याच वेळी लोन यांना शक्कल सुचली. त्यांनी पाण्याची टाकी रिकामी केली. तिचे तोंड बुजविले आणि तरंगण्यासाठी तिचा वापर केला. माङो कुटुंब सुरक्षितस्थळी हलविल्यानंतर मी वस्तीत परतलो. शेजारच्या सात कुटुंबांतील 26 जणांचे प्राण वाचविण्यासाठी अशाच तरंगत्या वस्तूंचा वापर केला, त्यांचे प्राण वाचविल्याचा आनंद हाच नव्या आयुष्याचा ठेवा आहे, अशी भावना त्यांच्या बोलण्यात होती. 
राज्य सरकारकडून 2क्क् कोटींची मदत 
जम्मू-काश्मीर सरकारने मंगळवारी 
जम्मू आणि काश्मीर खो:यासाठी प्रत्येकी 
1क्क् कोटींची मदत जारी केली. या दोन्ही भागाच्या विभागीय आयुक्तांकडे ही अतिरिक्त मदत पोहोचली आहे. 
 
हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीपासून बचावासाठी प्रत्येकच काश्मिरीच्या घरी थर्माकोलच्या फ्लोअरिंगचा वापर नेहमीच केला जातो. पाण्यावर तरंगण्यासाठी थर्माकोलचा वापर करता येऊ शकतो, एवढेच नव्हेतर ते जीवनरक्षक ठरू शकते, हे आता कळले, असे जवाहरनगरमधील शाबीर अहमद यांनी सांगितले. 
 
..अन् अश्रू तरळले : अहमद यांचे तीन मजली घर बुडाले. त्यांनी थर्माकोलच्या बंडलचा वापर करीत कुटुंबीयांचे प्राण वाचविले. त्यांना टाकाऊ वाटणा:या थर्माकोलने जीव वाचल्याचे समाधान कथन करताना डोळ्यांत अश्रू तरळले. 

 

Web Title: Stuck in the house with the big things

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.