हातगाडीवर गॅस वापरणार्यांवर अटक
By Admin | Updated: February 14, 2015 23:50 IST2015-02-14T23:50:55+5:302015-02-14T23:50:55+5:30
पुणे : खाद्यपदार्थ आणि चहा विक्री करणा-या हातगाडीवर व्यावसायिक सिलेंडरचा वापर करण्याऐवजी घरगुती सिलेंडरचा वापर केल्याप्रकरणी कोरेगांव पार्क पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी त्यांच्यावर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तु कायदा १९५५ च्या कलम ३ व ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वाहतुक नियंत्रण शाखेचे पोलीस शिपाई महेश सुभाष साळुंके (वय २८) यांनी फिर्याद दिली आहे.

हातगाडीवर गॅस वापरणार्यांवर अटक
प णे : खाद्यपदार्थ आणि चहा विक्री करणा-या हातगाडीवर व्यावसायिक सिलेंडरचा वापर करण्याऐवजी घरगुती सिलेंडरचा वापर केल्याप्रकरणी कोरेगांव पार्क पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी त्यांच्यावर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तु कायदा १९५५ च्या कलम ३ व ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वाहतुक नियंत्रण शाखेचे पोलीस शिपाई महेश सुभाष साळुंके (वय २८) यांनी फिर्याद दिली आहे. योहन देवसाहाय रेडीचर्ला (वय २५, बालाजी नगर, वंजेटी निवास, घोरपडी) आणि महादेव लिंगप्पा भिंगारे (वय २४, भैरोबा पंपिंग स्टेशन, रेणुकावस्ती, कोरेगाव पार्क) अशी आरोपींची नावे आहेत. योहन आणि महादेव यांची खाद्यपदार्थांची हातगाडी आहे. त्यांनी शुक्रवारी दुपारी ३च्या सुमारास साधु वासवाणी पुलाखाली हातगाडी लावली होती आणि खाद्यपदार्थ व चहा बनवण्यासाठी दोघांनी व्यावसायिक सिलेंडरऐवजी घरगुती सिलेंडरचा वापर केला.