तेज चक्रीवादळ अधिक सक्रिय; मासेमारीसाठी जाऊ नका, हवामान विभागाच्या मच्छिमारांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2023 04:44 PM2023-10-22T16:44:43+5:302023-10-22T16:45:13+5:30

हवामान विभागाने याबाबत माहिती दिली आहे. 

Stronger tornadoes more active; Don't go for fishing, Meteorological Department advises fishermen | तेज चक्रीवादळ अधिक सक्रिय; मासेमारीसाठी जाऊ नका, हवामान विभागाच्या मच्छिमारांना सूचना

तेज चक्रीवादळ अधिक सक्रिय; मासेमारीसाठी जाऊ नका, हवामान विभागाच्या मच्छिमारांना सूचना

नवी दिल्ली: मध्य बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. या चक्रीवादळाला ‘तेज’ असे नाव देण्यात आले आहे. हे वादळ आज दुपारपर्यंत अत्यंत तीव्र चक्रीवादळात रूपांतरित झाले आहे. हवामान विभागाने याबाबत माहिती दिली आहे. 

तेज चक्रीवादळाचा महाराष्ट्र आणि गुजरात किनारपट्टीला सध्या कोणताही धोका नसल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. अरबी समुद्रावर निर्माण झालेले वादळ २५ ऑक्टोबरच्या पहाटे अल घैदाह (येमेन) आणि सलालाह (ओमान) दरम्यान जाण्याची शक्यता आहे. आयएमडीने पुढे म्हटले आहे की पुढील २४ तासांत चक्रीवादळ आणखी तीव्र होईल. हे वादळ २१ ऑक्टोबर रोजी पारादीप (ओडिशा) पासून सुमारे ६२० किमी अंतरावर, रात्री १०.३० वाजता पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरावर केंद्रित झाले आहे.

मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याच्या सूचना

आयएमडीचे महासंचालक डॉ मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, बंगालच्या उपसागरात दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. पुढे, दाबाचे क्षेत्र खोल दाबात रूपांतरित होईल आणि उद्या ते आणखी तीव्र होऊन चक्रीवादळ बनू शकेल. २३-२५ ​​ऑक्टोबर दरम्यान ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. ते म्हणाले की, समुद्राची स्थिती अत्यंत वाईट आहे. मच्छीमार आणि जहाजांसाठी ते सुरक्षित नाही, त्यामुळे आम्ही सातत्याने इशारे देत आहोत, मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये आणि जे समुद्रात आहेत त्यांनी तातडीने परत यावे.

Web Title: Stronger tornadoes more active; Don't go for fishing, Meteorological Department advises fishermen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.