मंत्रिपदासाठी दिल्लीत जोरदार लॉबिंग
By Admin | Updated: May 26, 2014 03:11 IST2014-05-26T03:11:35+5:302014-05-26T03:11:35+5:30
मोदींच्या मंत्रिमंडळात कोण कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मंत्रिपदासाठी दिल्लीत जोरदार लॉबिंग
जयशंकर गुप्त, नवी दिल्ली - मोदींच्या मंत्रिमंडळात कोण कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत रविवार दिवसभर अटकळबाजीचा बाजार गरम होता. दुसरीकडे जोरदार लॉबिंगमध्ये नेतेमंडळी गुंतल्याचे दिसून आले. भाजपा आणि संघाच्या सर्वच नेत्यांनी मंत्रिमंडळ कसे असेल याबाबत भाष्य केलेले नाही. संध्याकाळपर्यंत गुपित होते. रात्री उशिरा मंत्र्यांची यादी राष्टÑपती भवनात पोहोचणार असल्याचे भाजपाच्या सूत्रांनी सांगितले. मोदी छोट्या मंत्रिमंडळासाठी आग्रही आहेत. तूर्तास २५ कॅबिनेट, स्वतंत्र कार्यभार असलेले ५ राज्यमंत्री, २० राज्यमंत्री असे स्वरूप राहणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. मित्रपक्षांचाही डोळा शिवसेना आणि तेलगू देसमला दोन किंवा एक कॅबिनेट तसेच प्रत्येकी दोन राज्यमंत्रिपदे दिली जाऊ शकतात. आडवाणी यांच्यासह मुरली मनोहर जोशी यांनीही मार्गदर्शकाची भूमिका बजावावी असे मोदींना वाटते. लोकसभेचे अध्यक्ष म्हणून कारिया मुंडा यांचे नाव समोर आले आहे, तसे झाल्यास आधी या पदासाठी चर्चेत असलेल्या मध्य प्रदेशच्या ज्येष्ठ नेत्या सुमित्रा महाजन यांना मंत्रिपद दिले जाईल.