भाजपा कार्यकर्त्यांचे केजरीवाल यांच्या घराबाहेर जोरदार निदर्शन
By Admin | Updated: April 29, 2015 17:54 IST2015-04-29T17:53:43+5:302015-04-29T17:54:29+5:30
दिल्लीचे कायदा मंत्री जितेंद्र सिंग तोमर यांची कायद्याची पदवी खोटी असल्याचे आरोप करत भाजपा कार्यकर्त्यांनी केजरीवाल यांच्या घराबाहेर जोरदार निदर्शन केले.

भाजपा कार्यकर्त्यांचे केजरीवाल यांच्या घराबाहेर जोरदार निदर्शन
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २९ - दिल्लीचे कायदा मंत्री जितेंद्र सिंग तोमर यांची कायद्याची पदवी खोटी असल्याचे आरोप करत भाजपा कार्यकर्त्यांनी केजरीवाल यांच्या घराबाहेर जोरदार निदर्शन केले.
या वेळी भाजपा कार्यकर्ते आप विरोधात घोषणाबाजी करत होते. तसेच तोमर यांच्या राजीनाम्याची मागणी करणारा फलकही कार्यकर्त्यांच्या हाती होता. या प्रकरणी अधिक माहिती देताना दिल्लीतील भाजपानेते सतिश उपाध्याय यांनी सांगितले की, जोपर्यंत तोमर राजीनामा देणार नाहित तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरू ठेवणार आहोत. कायदा मंत्र्यांनीच कायदा पायदळी तुडवला असल्याने आमचे कार्यकर्ते भर उन्हात आंदोलन करत असून या प्रकारचा अन्याय आम्ही सहन करणार नाही. असेही उपाध्याय यांनी सांगितले.