शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी यांच्याकडे काँग्रेसचे अध्यक्षपद देण्याची जोरदार मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2020 06:25 IST

काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांनी काँग्रेस खासदारांची एक बैठक शनिवारी सकाळी बोलावली होती. या बैठकीत पक्षाच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा राहुल गांधी यांना आणण्याची जोरदार मागणी करण्यात आली.

- हरिश गुप्तानवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्षपद पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्याकडे देण्याची मागणी शनिवारी एका बैठकीत अचानक करण्यात आली. ज्येष्ठ काँग्रेस नेते ए.के. अँटोनी यांनीही या मागणीचे जोरदार समर्थन केले.काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांनी काँग्रेस खासदारांची एक बैठक शनिवारी सकाळी बोलावली होती. या बैठकीत पक्षाच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा राहुल गांधी यांना आणण्याची जोरदार मागणी करण्यात आली. राहुल गांधी यांची पक्षाध्यक्षपदी निवड करण्याची मागणी करणाऱ्या खासदारांत कोडिकुन्नील सुरेश (केरळ), मनिक्कम टागोर (तामिळनाडू), गौरव गोगोई व अब्दुल खलिक (आसाम), मोहंमद जावेद (बिहार) आणि सप्तगिरी शंकर उलाका (ओडिशा) यांचा समावेश आहे. या मागणीला ए.के. अँटोनी यांनीही जोरदार पाठिंबा दिल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले. राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाची सूत्रे पुन्हा एकदा स्वीकारण्यासाठी हीच योग्य वेळ आहे, असे अँटोनी यांनी सांगितले.केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे राहुल गांधी हेही या बैठकीला उपस्थित होते. विशेष म्हणजे त्यांनी मागणीवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. याआधी जेव्हा-जेव्हा अशी मागणी समोर आली तेव्हा-तेव्हा ते नकार देत आले आहेत. यावेळी मात्र ते काहीच बोलले नाहीत.गेल्या महिन्यात काँग्रेस कार्यकारी समितीची बैठक झाली होती. या बैठकीत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि इतर काही नेत्यांनी अशीच मागणी केली होती.२0१९ च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा अचानक राजीनामा दिला होता. १0 आॅगस्ट रोजी सोनिया गांधी यांनी अंतरिम अध्यक्ष म्हणून सूत्रे स्वीकारली होती.सूत्रांनी सांगितले की, काँग्रेस कार्यकारी समितीची बैठक लवकरच होण्याची शक्यता असून, या बैठकीत यासंबंधीचा ठराव येऊ शकतो.

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी