शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

गुजरात निवडणुकांमध्ये काँग्रेसचे तगडे आव्हान, आपकडून त्रास

By यदू जोशी | Updated: November 28, 2022 11:06 IST

तरीही अहमदाबादमध्ये ॲडव्हान्टेज भाजप

यदु जोशी

अहमदाबाद : अहमदाबाद या आपल्या बालेकिल्ल्यात भाजपची मुख्यत्वे लढत आहे ती काँग्रेसशीच पण आम आदमी पार्टीकडून मतविभाजनाची भीती भाजपला सतावत आहे. मात्र, मोदी-शहांची  प्रतिमा, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांची  प्रतिष्ठा अन् केलेली विकासकामे आणि मोठा परंपरागत मतदार  या जोरावर  सध्याचे चित्र ॲडव्हान्टेज भाजप असेच आहे. 

आप कदाचित १ही जागा जिंकणार नाही पण अँटिइन्कम्बन्सीमुळे भाजपवर नाराज असलेले मतदार आपकडे वळले तर फायदा काँग्रेसला होईल. ते होऊ नये म्हणून आपला मत म्हणजे काँग्रेसला मत असा प्रचार भाजप करत आहे. मतदान विरोधात जाईल इतकी भाजपबद्दल नाराजी नसल्याचे लोकांशी बोलताना जाणवते. 

अंदाज काय?nएलिसब्रिज, मणिनगर, नारणपुरा, ठक्करबापा नगर, साबरमती, अमराईवाडी, असरवा हे मतदारसंघ भाजपचे गड आहेत. तेथील विजयाबाबत भाजप निश्चिंत आहे.n विरमगाम, साणंद, बापूनगर, दरियापूर, जमालपूर, दाणीलिमडा, धांदुका या सात जागा काँग्रेसने२०१७ मध्ये जिंकल्या होत्या. त्यातील एक किंवा दोन जागा यावेळी भाजपकडे जाण्याची शक्यता आहे. २१  पैकी १५ जागा भाजप जिंकेल असा अंदाज आहे.

हार्दिक विरुद्ध हार्दिकवीरमगाममध्ये गाजलेल्या पाटीदार आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल भाजपचे उमेदवार आहेत. काँग्रेसने गेल्यावेळी भाजपचा पराभव करणारे लखाभाई भारवाड यांना पुन्हा संधी दिली असली तरी हार्दिक यांच्या विजयाची भाजपला खात्री आहे. हार्दिक यांची मते खाण्यासाठी अन्य एक हार्दिक पटेल अपक्ष लढत आहेत. 

आरोपीच्या मुलीला भाजपचे तिकीटnगोधरा कांडाच्या वेळी नरोडा पाटिया कांडही चर्चेत राहिले. त्या केसमध्ये जामिनावर सुटलेले मनोज कुकराणी यांची डॉक्टर कन्या पायल कुकराणी या भाजप उमेदवार आहेत. त्या सर्वात तरुण उमेदवार आहेत. n १९९०पासून भाजपने येथे पराभव पाहिलेला नाही. काँग्रेसने मेघराज डोडवाणी यांना उमेदवारी दिली आहे. सिंधी समाजाची मोठी मते इथे आहेत आणि हिंदी भाषकांचीही.  आपने हिंदी भाषिक ओमप्रकाश तिवारी यांना उमेदवारी देत रंगत आणली आहे.  

अमित शहा उमेदवारअहमदाबादमधील एलिसब्रिज मतदारसंघात अमित शहा भाजपचे उमेदवार आहेत. केंद्रीय गृहमंत्री नव्हे तर हे आहेत अमित पोपटलाल शहा. ते पाचवेळा नगरसेवक, एकदा महापौरदेखील होते. ६३ व्या वर्षी ते प्रचारात झपझप फिरतात. त्यांचा उदंड उत्साह हा चर्चेचा विषय आहे.

टॅग्स :Gujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसAAPआप