शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
2
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
3
हेमंत सोरेन यांना दिलासा नाहीच, सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 13 मे रोजी होणार!
4
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन
5
“मोदींनी मान्य करावे की आता सत्तेत येत नाहीत”; पवार, ठाकरेंच्या ऑफरवर नाना पटोले थेट बोलले
6
'चाँदनी'ला अनोखी आदरांजली! अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील चौकाला श्रीदेवीचं नाव
7
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल
8
नरहरी झिरवळ शरद पवार गटाच्या वाटेवर, चौथ्या टप्प्यातील मतदानापूर्वी महायुतीला मोठा धक्का
9
‘नकली शिवसेनावाले मला जिवंत गाडण्याच्या बाता मारताहेत, म्हणताहेत…’ नरेंद्र मोदींची टीका  
10
ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार
11
तुमच्याकडेही SBI चे क्रेडिट कार्ड असेल तर 'हे' जाणून घ्या; होऊ शकते मोठे नुकसान
12
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करतात गंगापूजा; त्याबरोबरच देवघरातील गंगेशी संबंधित नियम वाचा!
13
Gold Silver Price: गेल्या अक्षय तृतीयेला घेतलेल्या सोन्याची किंमत किती झाली माहितीये? दरात झालीये मोठी वाढ
14
'बिग बॉस' फेम अब्दु रोझिकच्या लग्नाची बातमी खोटी? जवळचा मित्र शिव ठाकरे म्हणाला...
15
“नरेंद्र मोदी लटकता आत्मा, आमचे पवित्र आत्मे त्यांच्यासोबत जाणार नाही”; संजय राऊतांचा पलटवार
16
Akshaya Tritiya 2024: सुखाचा व धनाचा कधीही होणार नाही क्षय; अक्षय्य तृतीयेला घरी आणा 'ही' मूर्ती!
17
"यूपीत इंडिया आघाडीचे वादळ, नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत", राहुल गांधींचा हल्लाबोल
18
देशातील पहिला डिजिटल भिकारी राजूचे Heart Attack ने निधन, QR कोडद्वारे मागायचा भीक
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : "निलेश लंके तू किस झाड की पत्ती है..." अजित पवार यांचा इशारा
20
काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा शिंदे, अजितदादांसोबत या; PM मोदींची उद्धव ठाकरे, शरद पवारांना खुली 'ऑफर'

Hardik Patel: काँग्रेसला तगडा झटका! हार्दिक पटेलसह 1500 समर्थक भाजपत जाणार; पक्षाला मोठी मदत मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 8:31 PM

हार्दिक यांचा भाजप प्रवेश पाटीदार राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे...

गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल 2 जून रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांनी नुकताच काँग्रेसचा राजीनामा दिला होता. ते गुजरात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष होते. सातत्याने होत असलेल्या उपेक्षेमुळे ते नाराज होते. गांधी नगर येथील भाजप मुख्यालयात पोहोचून ते भाजपत प्रवेश करतील.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना हार्दिक पटेल यांनी 2 जून रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची पुष्टी केली आहे. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटील त्यांना भाजपचे सदस्यत्व देतील. यावेळी हार्दिक यांच्या सोबत त्यांचे काही समर्थकही भाजपत दाखल होणार असल्याचे बोलले जात आहे. हार्दिक पटेल यांच्या भाजप प्रवेशाचे एका भव्य कार्यक्रमात रूपांतर करण्याची भाजपची इच्छा आहे.

पाटीदार समाजाला आकर्षित करण्यासाठी भाजपला मिळणार मोठी मदत - हार्दिक पटेलसोबत जवळपास 1500 समर्थकही भाजपमध्ये सामील होणार असल्याचे बोलले जात आहे. हार्दिक यांचा भाजप प्रवेश पाटीदार राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. हार्दिक पटेल 2015 मध्ये गुजरातेत झालेल्या पाटीदार आरक्षण आंदोलनाचा मुख्य चेहरा होते.

हार्दिक पटेलांच्या काँग्रेस प्रवेशानंतर, आता आपल्याला पाटीदार समाजाचे समर्थन मिळेल, असे काँग्रेसला वाटत होते. मात्र, 2017 च्या विधानसभा निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे चांगली कामगिरी करूनही काँग्रेस सत्तेपासून दूरच राहिली होती.

निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला तगडा झटका -हार्दिक यांनी भाजपत प्रवेश करणे, हा काँग्रेससाठी निवडणुकीपूर्वीच मोठा झटका मानला जात आहे. काँग्रेस आधीच सातत्याने होणारे नेत्यांचे पलायन रोखण्यात अयशस्वी ठरत असल्याचे दिसते. मात्र, हार्दिक पटेलसंदर्भात भाजपकडून अद्याप कुठल्याही प्रकारची अधिकृत घोषणा झालेली नाही.

टॅग्स :hardik patelहार्दिक पटेलBJPभाजपाcongressकाँग्रेस