शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

म्यानमारच्या सीमेवर भारताची धडक कारवाई, नागा बंडखोरांचे तळ उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 02:56 IST

भारतीय लष्कराने बुधवारी पहाटे म्यानमारच्या सीमेवरील लांग्खू गावात कारवाई करून नागा दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले.

नवी दिल्ली : भारतीय लष्कराने बुधवारी पहाटे म्यानमारच्या सीमेवरील लांग्खू गावात कारवाई करून नागा दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. या नागा दहशतवाद्यांनी सीमेवर असलेल्या भारतीय जवानांवर हल्ला केल्यानंतर लगेचच लष्कराने पहाटे पावणेपाचच्या सुमारास ही कारवाई केली.लष्कराच्या ईस्टर्न कमांडने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय जवान म्यानमार सीमेवर गस्त घालत होते. त्यावेळी नागा बंडखोरांनी गोळीबार केला. जवानांनी गोळीबाराने प्रत्युत्तर दिले. त्यानंतर जोरदार कारवाई करून बंडखोरांचे तळच उद्ध्वस्त केले. कारवाईनंतर काही दहशतवादी पळून गेले आहेत. या कारवाईत एकही भारतीय जवान जखमी झाला नाही आणि भारतीय जवानांनी म्यानमारची सीमा ओलांडली नाही, हा सर्जिकल स्ट्राइक नव्हता, लष्करी कारवाई होती हेही स्पष्ट करण्यात आले.यापूर्वीही ‘नागा’वर वारयापूर्वी त्यांनी जून २0१५ मध्ये भारतीय जवानांवर हल्ला चढविला होता. त्यात १८ जवानांना वीरमरण आले होते. त्यावेळीही भारतानेम्यानमार सीमेवर अशीच कारवाई केली होती.त्यात २0 नागा दहशतवादी ठार झाले होते. भारताने एनएससीएन (के) या संघटनेवर पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे.- एस. सी. खापलांग हा या संघटनेचा प्रमुख असून, तो म्यानमारमधून कारवाया करीत असतो.सीमेवर दहशतवादी तळया कारवाईमध्ये अनेक नागा दहशतवादी ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र त्यांची संख्या उघड झाली नाही. नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल आॅफ नागालँड (खापलांग गट) चे दहशतवाद्यांचे भारत व म्यानमारच्या सीमेवरील गावांत काही तळ आहेत. ते दहशतवादी तेथून भारतीय जवानांवर हल्ले करीत असतात.‘आॅपरेशन अर्जुन’द्वारे भारताने शिकवला पाकला धडाभारतीय नागरी वस्त्यांवर आणि चौक्यांवर हल्ले करणा-या पाकिस्तानला अद्दल घडवण्यासाठी भारताच्या सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) राबविलेल्या ‘आॅपरेशन अर्जुन’मुळे पाकचे कंबरडे मोडले. सीमेवर पाकच्या लष्करी अधिका-यांच्या घरांना लक्ष्य करून झालेल्या या आॅपरेशनमध्ये पाकचे आठ सैनिक तसेच माजी सैनिक व अधिका-यांसह ११ नागरिक ठार झाले.

टॅग्स :Myanmarम्यानमारsurgical strikeसर्जिकल स्ट्राइक