विकास झाडे / सुरेश भुसारी ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : प्रत्येक राज्यातील प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यावर हल्लाबोल करून विरोधकाला नामोहरम करण्याची आणि सहयोगी पक्षांच्या नेत्यापुढे नमते घेण्याची भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची योजना यशस्वी झाली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीपासून अमित शहा हेच भाजपचे खरे सूत्रधार राहिले आहेत.शरद पवार लक्ष्यमहाराष्ट्रातील राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ही एक शक्ती आहे. या शक्तीला तडे दिल्यास भाजपचा मार्ग मोकळा होईल, हे स्पष्ट होते. यामुळे भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस व शरद पवार यांच्या परिवारावर प्रचाराचा फोकस केला होता. याचे परिणाम दिसून आले आहे.शिवसेनेसाठी शांतीदूतएका टप्प्यावर शिवसेनेसोबत कटुता निर्माण झाल्यानंतर सेना-भाजप युती व्हावी म्हणून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांचे रणनितीकार आणि जदयुचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांना चर्चेला पाठविले. ही चर्चाच दोन्ही पक्षात युती होण्याचे फलित ठरले. अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात अनेक चर्चा झाल्या. मतदानाच्या सातव्या फेरीनंतर अमित शहा यांनी एनडीएच्या सदस्यांसाठी स्नेहभोजन ठेवले होेते त्यात ठाकरे यांना सन्मानाची वागणूक मिळाली.
रणनिती शहा! विरोधकांवर प्रखर हल्लाबोल, सहयोगी दलाशी घेतले नमते!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 07:17 IST