शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलक शेतकऱ्यांच्या कोरोनापासून बचावासाठी काय केलं?; सर्वोच्च न्यायालयाचा सरकारला सवाल

By जयदीप दाभोळकर | Updated: January 7, 2021 14:23 IST

सुनावणीदरम्यान बोलताना न्यायालयानं सरकारी वकिलांना तबलिगी जमातचंही उदाहरण दिलं.

ठळक मुद्देशेतकरी आंदोलनातदरम्यान एकत्र आलेल्या शेतकऱ्यांसाठी करोनाच्या पार्श्वभूमीवर कोणती मार्गदर्शक तत्वे जाहीर केली, न्यायालयाचा सवालन्यायालयाकडून उदाहरण देताना तबलिगी जमातचा उल्लेख

नव्या कृषी कायद्यांविरोधात महिनाभरापेक्षा अधिक कालावधीपासून शेतकऱ्यांचं आदोलन सुरू आहे. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी झाले आहे. सध्या देशात करोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत असली तरी धोका पूर्णपणे टळलेला नाही. अशा परिस्थितीत आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांचं करोनापासून बचाव करण्यासाठी काय पावलं उचलली आहेत?, असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला केला आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाकडून तबलिगी जमातच्या एकत्र आलेल्या लोकांकडून करोनाच्या रुग्णांची संख्या वाढल्याचं उदाहरणही दिलं.आंदोलन करणारे शेतकरी एकाच ठिकाणी एकत्र आले आहेत. अशा परिस्थितीत आंदोलनाच्या स्थळी करोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारनं कोणती मार्गदर्शक तत्वे जाहीर केलीत? अशी विचारणा न्यायालयानं केली. तसंच याचं उत्तर देण्यासाठी केंद्राला न्यायालयानं दोन आठवड्यांचा कालावधी दिला आहे. "ठिक अशीच समस्या शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यानही निर्माण होऊ शकते. आम्हाला माहित नाही की शेतकऱ्यांना कोरोनापासून वाचवलं जात आहे की नाही. या ठिकाणी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कोणती मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आलीत. तुम्ही तबलिगी जमातच्या अनुभवातून काही बोध घेतला आहे का? तुम्हाला हे कसं झालं हे माहित आहे का?," असे प्रश्न तीन न्यायाधिशांच्या खंडपीठानं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना केले.तपास अजून सुरू"तबलिगी जमातच्या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे," असं तुषार मेहता यांनी सरकारच्यावतीनं न्यायालयाला सांगितलं. तसंच एका ठिकाणी अधिक लोकं उपस्थित असल्याच्या कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांचा उल्लेख करत दोन आठवड्यांचा कालावधी मागितला आहे. सर्वोच्च न्यायालयानं जम्मू काश्मीरच्या वकिल सुप्रिया पंडित यांच्याद्वारे जमात प्रकरणी सीबीआय तपासाची मागणी करण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान हा प्रश्न केला.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयcorona virusकोरोना वायरस बातम्याBJPभाजपाFarmer strikeशेतकरी संपHaryanaहरयाणाdelhiदिल्ली