बिहारला वादळाचा तडाखा; ३२ जण ठार
By Admin | Updated: April 23, 2015 02:06 IST2015-04-23T02:06:37+5:302015-04-23T02:06:37+5:30
बिहारच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मंगळवारी रात्री आलेल्या भीषण वादळात ३२ जण ठार, तर ८० च्या वर गंभीर जखमी झाले. वादळाच्या या तडाख्यात अनेक घरे भुईसपाट झाली

बिहारला वादळाचा तडाखा; ३२ जण ठार
पाटणा : बिहारच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मंगळवारी रात्री आलेल्या भीषण वादळात ३२ जण ठार, तर ८० च्या वर गंभीर जखमी झाले. वादळाच्या या तडाख्यात अनेक घरे भुईसपाट झाली, तर पिकांचेही अतोनात नुकसान झाले.
राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मुख्य सचिव व्यास यांनी बुधवारी येथे या वादळाची माहिती देताना सांगितले की, पूर्णिया जिल्ह्यात सर्वाधिक २५ लोक मृत्युमुखी पडले. मधेपुरात सहा, तर मधुबनीमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला. पूर्णिया, मधेपुरा, सहरसा, मधुबनी, समस्तीपूर आणि दरभंगा या जिल्ह्यात आलेल्या या वादळाने हजारो झाडे कोसळली. विद्युत तारा तुटल्या. मका,गहू आणि डाळीचे उभे पीक नष्ट झाले.
मार्गात ठिकठिकाणी झाडे कोसळली असल्याने या भागातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. वादळाचा वेग ताशी ६५ कि.मी. होता, अशी माहिती हवामान विभागाचे संचालक आर.के. गिरी यांनी दिली. नेपाळच्या दिशेने आलेले हे वादळ दरभंगापासून भागलपूरपर्यंत येऊन धडकले. (वृत्तसंस्था)