अनैतिक संबंधाला अडथळा, आईनेच केला मुलाचा खून

By Admin | Updated: February 8, 2016 02:14 IST2016-02-08T02:14:57+5:302016-02-08T02:14:57+5:30

फुरसुंगी (जि.पुणे) : अनैतिक संबंधाला अडथळा ठरणार्‍या मुलाचा जन्मदात्या आईनेच प्रियकराच्या मदतीने खून केल्याची धक्कादायक घटना हडपसर परिसरात घडली. महिला व तिच्या प्रियकराने दिल्ली येथून मुलाचे अपहरण करून त्याचा निर्घृण खून केला. नंतर त्याचे शव राहत्या घरातच पुरले. पोलिसांनी रविवारी दोघांनाही अटक केली.

Stopping immoral relations, mother committed suicide | अनैतिक संबंधाला अडथळा, आईनेच केला मुलाचा खून

अनैतिक संबंधाला अडथळा, आईनेच केला मुलाचा खून

रसुंगी (जि.पुणे) : अनैतिक संबंधाला अडथळा ठरणार्‍या मुलाचा जन्मदात्या आईनेच प्रियकराच्या मदतीने खून केल्याची धक्कादायक घटना हडपसर परिसरात घडली. महिला व तिच्या प्रियकराने दिल्ली येथून मुलाचे अपहरण करून त्याचा निर्घृण खून केला. नंतर त्याचे शव राहत्या घरातच पुरले. पोलिसांनी रविवारी दोघांनाही अटक केली.
निकोलस ऊर्फ निकू (१५, रा. दक्षिण दिल्ली) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी त्याची आई वरिता ऊर्फ ऋति (४०) व तिचा प्रियकर युनुस रहेमत अली (३३, सध्या रा. फुरसुंगी, मूळ रा. मुंबई) या दोघांविरुद्ध अपहरण व खुनाचा गुन्हा दाखल केला करून अटक केली. हडपसर पोलिसांच्या मदतीने दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली.

Web Title: Stopping immoral relations, mother committed suicide