टाकळीभान बंद, रास्ता रोको
By Admin | Updated: August 19, 2015 22:27 IST2015-08-19T22:27:34+5:302015-08-19T22:27:34+5:30
टाकळीभान : शेत जमिनीच्या वादातून आदिवासी समाजावर जळीताचे खोटे गुन्हे दाखल करून अन्याय केल्याच्या निषेधार्थ बुधवारी टाकळीभान (ता. श्रीरामपूर) येथे बस थांब्यासमोर दीड तास रास्ता रोको करुन गावबंद आंदोलन करण्यात आले.

टाकळीभान बंद, रास्ता रोको
ट कळीभान : शेत जमिनीच्या वादातून आदिवासी समाजावर जळीताचे खोटे गुन्हे दाखल करून अन्याय केल्याच्या निषेधार्थ बुधवारी टाकळीभान (ता. श्रीरामपूर) येथे बस थांब्यासमोर दीड तास रास्ता रोको करुन गावबंद आंदोलन करण्यात आले.भिल्ल समाजाचे प्रदेशाध्यक्ष शिवाजी गांगुर्डे, रिपाइंचे आबासाहेब रणनवरे यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी समाजाच्या महिलांसह रास्तारोको करण्यात आला. गट क्रमांक १४१/१ मधील शेतजमीन चंद्रभान सूर्यभान गांगुर्डे यांच्या वडिलांच्या मालकीची आहे. पण त्यांच्या अडाणीपणाचा गैरफायदा घेऊन अनिल कांबळे व पोपट धस यांनी तलाठ्यास हाताशी धरुन जमिनीचे खोटे रेकॉर्ड बनवून जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला. प्रकरण हाताबाहेर जात असल्याने त्यांनी कट कारस्थान रचून आदिवासी समाजावर जळीताचे खोटे गुन्हे दाखल करण्यास भाग पाडले. पोलिसांनी याबाबत शहानिशा न करताच गुन्हे दाखल करुन समाजावर अन्याय केल्याचे गांगुर्डे म्हणाले.माजी सभापती नानासाहेब पवार म्हणाले, आदिवासी समाज प्रामाणिक आहे. घर जाळण्यासारखे वाईट कृत्य त्यांच्याहातून होणार नाही. पण त्यांच्यावर जळीताचा गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्यावर अन्याय झाला आहे. आम्ही सर्व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू.तंटामुक्तीचे अध्यक्ष भाऊसाहेब दाभाडे म्हणाले, कांबळे यांनी पोलिसांना हाताशी धरुन आदिवासींवर खोटे गुन्हे दाखल केले. घटनेची फेरचौकशी करून सत्य उजेडात आणावे. यावेळी काँग्रेसचे राजेंद्र कोकणे, भाजपचे बंडू हापसे, कचरू गायकवाड यांची भाषणे झाली. तहसील कार्यालयाचे एस. बी. पाटोळे, तलाठी आकांक्षा ठोके, हिवाळे, फौजदार यशवंत राक्षे, तुरनर यांनी निवेदन स्वीकारले. (वार्ताहर)-----------फोटोफाईलनेम १९०८-एसएचआर-०५टाकळीभान रास्तारोको.जेपीजीटाकळीभान (ता.श्रीरामपूर) येथे आदिवासींवर खोटे गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ बुधवारी रास्तारोको करून गाव बंद आंदोलन करण्यात आले.