मुंबईत चार दिवस मांस विक्री बंद

By Admin | Updated: September 7, 2015 23:27 IST2015-09-07T23:27:36+5:302015-09-07T23:27:36+5:30

मुंबईत चार दिवस मांस विक्री बंद

Stop selling meat for four days in Mumbai | मुंबईत चार दिवस मांस विक्री बंद

मुंबईत चार दिवस मांस विक्री बंद

ंबईत चार दिवस मांस विक्री बंद
मुंबई : मिरा भाईंदर महापालिकेपाठोपाठ आता मुंबई महापालिकेनेही जैन धर्मियांच्या पर्युषण काळात चार दिवस मांस विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपच्या मागणीनुसार पालिका आयुक्तांनी मांस विक्रीचा प्रस्ताव मंजूर केला आहे.
मिरा भाईंदर पालिका क्षेत्रात पर्युषण सप्ताहामुळे आठ दिवस मांस विक्रीवर बंदी लागू केली आहे. यावरुन राजकारण सुरु झाले असतानाच मुंबई महापालिका क्षेत्रातही आठ दिवस मांस विक्री बंद ठेवण्याचा प्रस्ताव भाजपने तयार केला होता. हा प्रस्ताव महापालिका सभागृहात मांडण्याचा भाजपचा प्रयत्न होता. परंतू त्याला विरोधकांकडून कडाडून विरोध होण्याची शक्यता होती. त्यामुळे भाजपने हा प्रस्ताव पालिका आयुक्तांकडे मांडून तो मंजूर करुन घेतला. आयुक्तांनी चार दिवस मांस विक्रीच्या बंदीला परवानगी दिली असल्याचे, सुत्रांनी सांगितले.
दरम्यान, पालिकेने देवनार पशुवधगृहातील सर्व वध विभाग १०, १२, १३, १७ आणि १८ सप्टेंबर रोजी म्हणजेच श्रावण वद्य, भादर्व सूद एकम, गणेश चतुर्थी, संवत्सरी या पर्यूषण पर्व काळात बंद ठेवण्याचा निर्णयही यापुर्वीच घेतला आहे.

Web Title: Stop selling meat for four days in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.