शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला वेळीच थोपवा, पंतप्रधान मोदी यांचे राज्यांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 07:18 IST

कोरोनाच्या वाढत्या फैलावाबद्दल तसेच लसीकरण मोहिमेविषयी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला.

नवी दिल्ली : देशात येऊ घातलेली कोरोना साथीची दुसरी लाट थोपविणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी तातडीने ठोस पावले उचलायला हवीत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांना केले आहे. कोरोनाच्या वाढत्या फैलावाबद्दल तसेच लसीकरण मोहिमेविषयी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. मोदी म्हणाले की, महाराष्ट्र, पंजाब, मध्य प्रदेशसारख्या राज्यांमध्ये गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सुमारे ७० जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्याच्या प्रमाणात सुमारे दीडशेहून अधिक टक्के वाढ झाली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला वेळीच थोपविले नाही तर ही साथ पूर्वीपेक्षा आणखी उग्र रूप धारण करू शकते. देश कोरोना संसर्गाशी मुकाबला करताना निष्काळजीपणा दाखवू नये. कोरोना साथीला रोखण्यासाठी राज्यांनी चाचण्यांची संख्या वाढवावी, प्रतिबंधात्मक उपायांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आवाहनही नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना केले.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याBJPभाजपाState Governmentराज्य सरकार