नववर्षोत्सवातील संगीताचा दणदणाट थांबवा - जोड आहे

By Admin | Updated: December 25, 2014 22:41 IST2014-12-25T22:41:00+5:302014-12-25T22:41:00+5:30

हरित लवाद : कडक कारवाई करण्याचे आदेश

Stop the repetition of music from the New Year's Festival - is a pair | नववर्षोत्सवातील संगीताचा दणदणाट थांबवा - जोड आहे

नववर्षोत्सवातील संगीताचा दणदणाट थांबवा - जोड आहे

ित लवाद : कडक कारवाई करण्याचे आदेश

नागपूर : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कर्णकर्कश संगीताचा दणदणाट करण्याचा बेत असल्यास विसरून जा. अन्यथा तुम्हाला कारागृहाची हवा खावी लागू शकते. राष्ट्रीय हरित लवादाच्या पुणे खंडपीठाने नवीन वर्षाच्या कार्यक्रमात आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
नागपूर येथील पर्यावरणप्रेमी डॉ. रवींद्र भुसारी यांनी फटाकेबंदी व ध्वनिप्रदूषणासंदर्भात याचिका दाखल केली आहे. नवीन वर्ष साजरे करताना अतिउत्साही लोकांचा जमाव मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण करतात. शहरात फिरताना कारमधील हॉर्न विनाकारण वाजवतात. फटाके उडवतात. डॉल्बी सिस्टीम लावून बेकायदेशीर पार्ट्या आयोजित करतात. त्याकडे कोणीही लक्ष देत नाही, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे होते. यावर लवादाचे न्यायिक सदस्य ़विकास किनगावकर व तज्ज्ञ सदस्य डॉ़ अजय देशपांडे यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) व पोलीस विभागाला ध्वनिप्रदूषणासंदर्भातील कायदे तोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. बेकायदेशीर डॉल्बी सिस्टीम जप्त करण्यात यावेत, डॉल्बी सिस्टीम लावणाऱ्या वाहन मालकावर कारवाई करण्यात यावी, शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे व पोलीस कंट्रोल रुममधून ध्वनीप्रदूषणावर लक्ष ठेवावे, असे निर्देशही लवादाने दिले आहेत. याचिकाकर्त्यातर्फे ॲड़ असीम सरोदे, ॲड. विकास शिंदे व ॲड़ प्रताप विटणकर यांनी बाजू मांडली.
--------------------
चौकट....
विविध संस्कृतीमधील चांगला भाग उचलून वाईट भागाचे अनुकरण टाळले पाहिजे. राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयामुळे सर्वांना याची जाणीव होईल.
----- ॲड़ असीम सरोदे

Web Title: Stop the repetition of music from the New Year's Festival - is a pair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.