शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीर भारताचाच, नाक खुपसणं थांबवा; ओवेसींचे पाकिस्तानला खडे बोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2019 20:51 IST

काश्मीर भारताचा अविभाज्य घटक आहे अन् सदैव राहील, असं ओवेसींनी म्हटलं

हैदराबाद: काश्मीरमध्ये लुडबुड करणं थांबवा. काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे आणि यापुढेही राहील, अशा शब्दांमध्ये एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी पाकिस्तानला सुनावलं आहे. पाकिस्ताननं काश्मीर प्रश्नात मध्यस्थी करण्याची गरज नाही. काश्मीर प्रश्नात नाक घुसवणं पाकिस्ताननं बंद करावं, असं ओवेसी म्हणाले. ते हैदराबादमध्ये पक्षाच्या रॅलीत बोलत होते. जानेवारीच्या सुरुवातीला पाकिस्ताननं पुन्हा एकदा काश्मीरचा प्रश्न उपस्थित केला होता. पाकिस्तानी सैन्यातील वरिष्ठ अधिकारी असिफ गफूर यांनी भारतीय लष्करावर टीका केली होती. भारतीय सैन्याच्या कारवायांमुळे शूर काश्मिरींच्या मनातील स्वातंत्र्याची भावना दडपली जाणार नाही, असं ट्विट त्यांनी केलं होतं. याशिवाय भारतीय लष्कराकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन होत असल्याचाही आरोप केला होता. भारतीय जवान नियंत्रण रेषेवरील गावातील नागरिकांना लक्ष्य करतात, असा दावादेखील त्यांनी केला. या पार्श्वभूमीवर ओवेसींनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले. ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी काही दिवसांपूर्वी अहिष्णुता आणि गोसंवर्धानाच्या नावाखाली सुरू असलेल्या झुंडशाहीवर जोरदार टीका केली होती. त्यावर पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी अल्पसंख्यांकांना कशी वागणूक दिली जाते, हे आम्ही दाखवून देऊ, असं उत्तर दिलं होतं. त्यावरुन हैदराबादचे खासदार ओवेसींनी खान यांना प्रत्युत्तर दिलं. 'पाकिस्तानी संविधानानुसार तिथे केवळ मुस्लिम व्यक्तीच राष्ट्रपती होऊ शकते. मात्र भारतात अल्पसंख्याक समाजाचे अनेक राष्ट्रपती होऊन गेले आहेत. त्यामुळे खान साहेबांनी आमच्याकडून सर्वसमावेश राजकारण आणि अल्पसंख्यांकांच्या अधिकारांचे धडे घ्यावेत,' असं ओवेसी म्हणाले होते. 

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीJammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तानIndian Armyभारतीय जवानImran Khanइम्रान खान