शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीवरचे आरोप थांबवा; शिंदे गटाचा ठाकरेंना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 06:43 IST

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अडीच वर्षे दिल्लीवर आरोप सुरू होते. आता हे राजकारण थांबले पाहिजे, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते आ. दीपक केसरकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व त्यांच्या समर्थकांना दिला आहे. राज्य आणि केंद्राच्या चांगल्या संबंधांमुळे राज्याचा गाडा सुरळीत चालू शकतो, याचा विचार गेली अडीच वर्षे केला नाही असेही ते म्हणाले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. त्यांच्याबद्दल आम्ही काहीच बोलणार नाही. त्यांच्यावर टीकाही करणार नाही, असे केसरकर यांनी आधी म्हटले होते.  मात्र, आज ते पत्रपरिषदेत ते म्हणाले की, त्यांचे प्रवक्ते रोज सकाळी उठून केंद्रावर टीका करत होते. त्यामुळे केंद्रासोबत असलेले संबंध बिघडले. गेली अडीच वर्षे राजकारण सुरू होते. दिल्लीवर आरोप सुरू होते. आता हे राजकारण थांबले पाहिजे. त्यांनी, हातकणंगलेचे शिवसेना खासदार धैर्यशील माने यांच्या घरावर मोर्चा काढला. आमच्यासोबत आलेल्या खासदारांच्या घरांवर मोर्चे काढले जात आहेत. त्यांना जाब विचारले जात आहेत. लोकांना का भडकवताय? असा थेट सवाल त्यांनी उद्धव यांना केला. कालपर्यंत कुठेही न फिरणारे आता फिरू लागलेत. मंत्रालयातील सातव्या मजल्यावरील कार्यालयात ते किती वेळा गेले आणि काय काम केले? बांधावर जा म्हणून सांगायचे. मग, आता कार्यकर्त्यांना सांगून बांधावर जायला का सांगत नाहीत? असा सवाल त्यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता केला.

‘ठाकरेंनी एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही’  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांचे बोलणे सुरू होते. मात्र, १२ आमदारांचे निलंबन झाल्यानंतर हे बोलणे थांबले हे खरे आहे का, या प्रश्नासह तीन प्रश्न मी विचारले होते. मात्र, एकाही प्रश्नावर ते उत्तर देऊ शकले नाहीत. आज ज्या काही भावना भडकावल्या जात आहेत त्या कितपत योग्य आहेत याचा विचार करा. आज राज्याला शांतता हवी आहे. ती लोकांना आणि राज्याला समृद्धीकडे घेऊन जाईल. ती शांतता राज्याला द्यायची की नाही याचा विचार केला पाहिजे, असे केसरकर म्हणाले.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे