चोरलेली एसटी बस सापडली! -----------------
By Admin | Updated: July 12, 2015 23:56 IST2015-07-12T23:56:46+5:302015-07-12T23:56:46+5:30
शिरवळ (सांगली) : येथील बसस्थानकात रात्रीची मुक्कामी असलेली चोरलेली एसटी बस तासाभरानंतर बारा किलोमीटरवर खंडाळा परिसरात सापडल्याने आगारप्रमुखांचा जीव भांड्यात पडला.

चोरलेली एसटी बस सापडली! -----------------
श रवळ (सांगली) : येथील बसस्थानकात रात्रीची मुक्कामी असलेली चोरलेली एसटी बस तासाभरानंतर बारा किलोमीटरवर खंडाळा परिसरात सापडल्याने आगारप्रमुखांचा जीव भांड्यात पडला.शनिवारी चालक नाना सीताराम शिलवंत यांनी बस शिरवळ बसस्थानकाच्या आवारात लावली. त्यानंतर ते झोपण्यास गेले. पहाटे पाच वाजता त्यांना बस दिसली नाही. त्यानंतर बस चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी थेट पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनीही तत्काळ ठिकठिकाणी बिनतारी संदेश पाठविले होते. पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)