फरांदेनगरात चोरी
By Admin | Updated: December 20, 2014 22:27 IST2014-12-20T22:27:55+5:302014-12-20T22:27:55+5:30
भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील फरांदेनगरात चोरट्यांनी घर फोडून ६६ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली़ याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला़

फरांदेनगरात चोरी
भ ग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील फरांदेनगरात चोरट्यांनी घर फोडून ६६ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली़ याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला़ प्रलोभ माधवराव कुलकर्णी हे १३ ते १५ डिसेंबर दरम्यान कार्यक्रमासाठी नाशिक येथील नातेवाईकाकडे गेले होते़ त्याच दरम्यान चोरट्याने घराचा कडी-कोंडा तोडून आत प्रवेश केला़ यावेळी घरातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख ५०० रुपये असा एकुण ६६ हजारांचा ऐवज लंपास केला़ याप्रकरणी प्रलोभ कुलकर्णी यांनी भाग्यनगर ठाण्यात तक्रार दिली़