शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आझम खान यांच्या विद्यापीठात सापडली 1774 मध्ये चोरीस गेलेली पुस्तके 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 18:10 IST

विद्यापीठावर टाकण्यात आलेल्या छाप्यात सुमारे 245 वर्षांपूर्वी 1774 मध्ये चोरीस गेलेली पुस्तके आढळून आली आहेत.

लखनौ - समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान गेल्या काही काळापासून सातत्याने अडचणीत सापडत आहेत. आता नव्या प्रकरणामध्ये रामपूर येथे असलेला आझम खान यांच्या विद्यापीठावर टाकण्यात आलेल्या छाप्यात सुमारे 245 वर्षांपूर्वी 1774 मध्ये चोरीस गेलेली पुस्तके आढळून आली आहेत. रामपूर येथील जौहर विद्यापीठावर टाकण्यात आलेल्या या धाडीत सुमारे 300 पुस्तके जप्त करण्यात आली असून, ही पुस्तके 100 ते 150 वर्षांपूर्वीची असल्याचा  दावा पोलिसांनी केला आहे. याप्रकरणी विद्यापीठातील चार कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस अधिकारी अजय शर्मा यांनी सांगितले की, 'रामपूरमधील मदरसा आलिया येथून 1774 मध्ये काही प्राचीन पुस्तके चोरीस गेली होती. ही पुस्तके जौहर विद्यापीठाच्या वाचनालयातून जप्त करण्यात आली आहेत.' दरम्यान, सध्या विद्यापीठाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी विद्यापीठाच्या आवारात उपस्थित असून, शोधमोहीम सुरू आहे. मदरसा आलियामधील पुस्तकांच्या चोरीबाबतच्या तपासासाठी जौहर विद्यापीठामध्ये शोधमोहीम राबवण्यात आली होती. विद्यापीठातील मुमताज सेंट्रल लाइब्ररीमध्ये सीओंसह पोलीस अधिकारी तपास करत आहेत. याआधीही जौहर विद्यापीठाविरोधात प्रशासनाकडून काही प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करून कारवाईचे आदेश देण्यात आले होते. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPoliticsराजकारण