कुलूप तोडून २.३६ लाखाच्या मुद्देमालाची चोरी
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:10+5:302015-02-18T00:13:10+5:30
कुलूप तोडून २.३६ लाखाच्या मुद्देमालाची चोरी

कुलूप तोडून २.३६ लाखाच्या मुद्देमालाची चोरी
क लूप तोडून २.३६ लाखाच्या मुद्देमालाची चोरीनागपूर : घराला कुलूप लावून बाहेरगावी गेल्याचा फायदा घेत अज्ञात आरोपीने घरातील सोन्याचांदीचे दागिने व रोख २.२० लाख असा एकूण २.३६ लाखाचा मुद्देमाल पळविला. ही घटना गिट्टीखदान पोलीस ठाण्यांतर्गत आरएमएस कॉलनी, जाफरनगर येथे शनिवारी सायंकाळी ६.३० ते रविवारी सकाळी १०.२५ वाजताच्या दरम्यान घडली. राजेंद्र रामभाऊ पेठेकर (४६) रा. जाफरनगर हे आपल्या घराला कुलूप लावून कुटुंबासह मुंबईला गेले होते. अज्ञात आरोपीने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्याने बेडरुममधील लोखंडी आलमारीतील सोन्याचांदीचे दागिने व रोख २.२० लाख असा एकूण २ लाख ३६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.