शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवक म्हणून उभे राहण्यासाठी ८० लाख! आपने तिकिटे विकल्याचा आरोप; स्टिंगमुळे खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 09:18 IST

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी येथे पत्रकार परिषदेत कथित स्टिंग व्हिडीओ प्रसारित करून आप  व या पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल भ्रष्टाचारात खोलवर गुंतले असल्याचा आरोप केला.

नवी दिल्ली : भाजपने सोमवारी एक ‘स्टिंग व्हिडीओ’ प्रसारित करत आम आदमी पार्टीने (आप) दिल्ली महानगरपालिका (एमसीडी) निवडणुकीसाठी तिकिटे विकल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. वायव्य दिल्लीच्या रोहिणी भागातील ‘आप’च्या एका माजी कार्यकर्तीने कथितरीत्या हा व्हिडीओ चित्रित केला आहे. दुसरीकडे ‘आप’चे आमदार दिलीप पांडे यांनी हा स्टिंग व्हिडीओ ‘फेक’ असल्याचे सांगत आरोप धुडकावून लावले. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी येथे पत्रकार परिषदेत कथित स्टिंग व्हिडीओ प्रसारित करून आप  व या पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल भ्रष्टाचारात खोलवर गुंतले असल्याचा आरोप केला. ‘आप’च्या माजी कार्यकर्त्या बिंदू यांनी हा व्हिडीओ चित्रीत केला आहे. बिंदू एमसीडी निवडणूक रोहिणी डी प्रभागातून ‘आप’च्या तिकिटावर लढवू इच्छित होत्या. त्या तिकीट मागण्यासाठी गेल्या. तेव्हा त्यांच्याकडे ८० लाख रुपयांची मागणी करण्यात आली, 

‘आप’चे प्रत्युत्तर‘भाजप’च्या आरोपांना प्रत्युत्तर देताना, ‘आप’चे दिलीप पांडे म्हणाले की, एमसीडी निवडणुकीसाठी पक्षाच्या तिकिटांना खूप मागणी होती. ‘अनेक दलाल सक्रिय झाले. दलाल सक्रिय झाले तरी पैशाच्या जोरावर तिकीट दिले गेले नाही. भाजपने काहीही केले नाही. ‘आप’ म्हणजे भाजप किंवा काँग्रेस नाही, जिथे पैसे देणाऱ्यांना तिकिटे वाटली जातात. भाजप दररोज आणत असलेल्या खोट्या स्टिंग ऑपरेशन्सवरून असे दिसून येते की, तो पक्ष निवडणुकीत अत्यंत वाईट पद्धतीने मात खाणार आहे,’ असेही ते म्हणाले. आप नेत्यांनी पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करून श्रीमंतांना तिकिटे वाटली, असा आरोप बिंदू यांनी केला. 

सगळेच सामील‘आप’ने तिकिटे विकली. मी खूप विचार करून हे स्टिंग केले. हे काही ठरावीक नेत्यांचे काम नाही. यात सर्वच सामील आहेत. खालपासून वरपर्यंत. मी दुर्गेश पाठक यांच्याकडे तक्रार करून काहीही झाले नाही. मला ८० लाखांची मागणी करण्यात आली.     - बिंदू, आपची माजी कार्यकर्ती

चौकशीची मागणीरोहिणीतील भाजप आमदार विजेंदर गुप्ता यांनी २०२०च्या विधानसभा निवडणुकीतही आप नेत्यांनी तिकिटेही विकल्याचा आरोप करून याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्याची मागणी केली. दिल्लीत एमसीडीच्या निवडणुका ४ डिसेंबरला होणार आहेत.

टॅग्स :Aam Admi partyआम आदमी पार्टीAAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालBJPभाजपाdelhiदिल्ली