स्टिल चोरले....पुरले.... विकले नऊ जणांची टोळी : दोघांना अटक

By Admin | Updated: March 6, 2015 23:07 IST2015-03-06T23:07:22+5:302015-03-06T23:07:22+5:30

अहमदनगर : इमामपूर घाटात ट्रकचालकाला चाकूचा धाक दाखवून १२ टन स्टिलची चोरी करून ते लंपास केल्याप्रकरणातील दोघांना एम.आय.डी. सी. पोलिसांनी अटक केली आहे. स्टिल चोरल्यानंतर त्यांनी ते एका जमिनीत पुरले. त्यातील काही स्टिलची विक्री केली. घाटात वाहनांना लुटणार्‍या नऊ जणांच्या टोळीचा छडा लागला असून त्यातील दोघांना गुरुवारी मध्यरात्री अटक केली आहे,अशी माहिती पोलीस उपअधीक्षक वाय.डी. पाटील यांनी दिली.

Still thieves .... burglar .... The winged nine people: The two arrested | स्टिल चोरले....पुरले.... विकले नऊ जणांची टोळी : दोघांना अटक

स्टिल चोरले....पुरले.... विकले नऊ जणांची टोळी : दोघांना अटक

मदनगर : इमामपूर घाटात ट्रकचालकाला चाकूचा धाक दाखवून १२ टन स्टिलची चोरी करून ते लंपास केल्याप्रकरणातील दोघांना एम.आय.डी. सी. पोलिसांनी अटक केली आहे. स्टिल चोरल्यानंतर त्यांनी ते एका जमिनीत पुरले. त्यातील काही स्टिलची विक्री केली. घाटात वाहनांना लुटणार्‍या नऊ जणांच्या टोळीचा छडा लागला असून त्यातील दोघांना गुरुवारी मध्यरात्री अटक केली आहे,अशी माहिती पोलीस उपअधीक्षक वाय.डी. पाटील यांनी दिली.
औरंगाबाद रोडवरील इमामपूर घाटात २८ फेब्रुवारीला रात्री राजेंद्र नवनाथ घुगे (रा. वडझरी, ता. आष्टी, जि. बीड) हे ट्रकमधून १२ टन स्टिल जालना येथून पुण्याकडे घेऊन निघाले होते. मध्यरात्री सदरचा ट्रक इमामपूर घाटात आल्यानंतर तिघांनी ट्रकला दुचाकी आडवी लावून ट्रकचालकाच्या हातावर चाकूूचा वार करून ट्रकचालकाला मारहाण केली होती. त्यानंतर ते ट्रक घेऊन जाण्याच्या बेतात होते, मात्र १२ टन वजनाचा ट्रक चालविणे चोरट्यांना अशक्य झाले. त्यांनी आणखी एक ट्रॅक्टर मागवून रातोरात ट्रकमधील स्टिलच्या सळाया ट्रॅक्टरमध्ये टाकल्या. त्यानंतर ट्रॅक्टर आणि ट्रकमधील स्टिल मोरगव्हाण (ता. नेवासा) येथील वन खात्याच्या जमिनीमध्ये पुरले. त्यासाठी जेसीबीने खड्डे खोदले. दुसरा स्टिलचा ट्रक करंजी येथील घाटात आणून ठेवला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी स्टिल चोरणार्‍या दोघांना यापूर्वी दुसर्‍या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी इमामपूर घाटातील लुटीच्या घटनेचा शोध घेतला.
स्टिल चोरणारी नऊ जणांची टोळी असल्याचे उघड झाले आहे. त्यातील शुभम विष्णू जाधव (वय २०), राहुल बाबासाहेब दारगुडे (वय २२, रा. मोरगव्हाण, ता. नेवासा) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
-----------
निम्मे स्टिल पुरले.. निम्मे विकले...
ट्रकसह १२ टन वजनाचे स्टिल (लोखंडी सळाया) लंपास केल्यानंतर चोरट्यांनी मोरगव्हाण (ता. नेवासा) येथील वनखात्याच्या जमिनीत स्टिल पुरले. १२ पैकी साडेचार टनांची घाटपिंप्री (ता. आष्टी, जि.बीड) येथे विक्री केल्याची कबुली चोरट्यांनी दिली. तर ७ ते ८ टन स्टिल वनखात्याच्या जमिनीत पुरले. चोरट्यांनी जेसीबीद्वारे खड्डे खोदले आणि जेसीबीच्या सहाय्यानेच ते पुरले.
---------
अपूर्ण.....

Web Title: Still thieves .... burglar .... The winged nine people: The two arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.