अजूनही मी स्वतंत्र नाही, पती विरहाने हादियाने व्यक्त केली खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 01:45 AM2017-11-30T01:45:26+5:302017-11-30T01:46:47+5:30

सर्वोच्च न्यायालयाकडे मी स्वातंत्र्याची मागणी केली होती. परंतु पती शेफिन जहाँला भेटता येत नसल्याने अजूनही खºया अर्थाने स्वतंत्र नाही, अशी खंत हादिया उर्फ अखिला या केरळमधील तरुणीने व्यक्त केली आहे.

 Still, I am not free, my husband expressed my love for me | अजूनही मी स्वतंत्र नाही, पती विरहाने हादियाने व्यक्त केली खंत

अजूनही मी स्वतंत्र नाही, पती विरहाने हादियाने व्यक्त केली खंत

Next

सेलम : सर्वोच्च न्यायालयाकडे मी स्वातंत्र्याची मागणी केली होती. परंतु पती शेफिन जहाँला भेटता येत नसल्याने अजूनही खºया अर्थाने स्वतंत्र नाही, अशी खंत हादिया उर्फ अखिला या केरळमधील तरुणीने व्यक्त केली आहे.
धर्मांतर करून मुस्लिमाशी विवाह केल्याने देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या केरळमधील ‘लव्ह जिहाद’ प्रकरणातील ही तरुणी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी मंगळवारी शिवराज होमिओपथिक मेडिकल कॉलेजात दाखल झाली. तेथे तिने सुमारे सहा महिन्यांची अनुपस्थिती माफ करून शिक्षण पुढे सुरु ठेवण्यासाठी विद्यापीठाकडे करायचे अर्ज भरण्याच्या औपचारिकता पूर्ण केल्या.
कॉलेजमध्ये पत्रकारांशी हादिया म्हणाली की, मला माझ्या पतीला भेटायचे आहे. पण तो मला येथे येऊन भेटू शकत नाही, असे कॉलेजवाले म्हणतात. पतीने भेटण्यास न्यायालयाने बंदी केलेली नाही, असे मला वाटते. पण कॉलेजवाले संभ्रमात आहेत. खुलासा करून घ्यायला त्यांना आणखी दोन दिवस वेळ द्यायला हवा.

ती अखिलाच

सर्वोच्च न्यायालयाने ज्यांना हादियाचे पालक नेमले आहे ते कॉलेजचे प्राचार्य जी. कन्नन म्हणाले की, आमच्यासाठी हादिया अजूनही अखिलाच आहे. तिची जबाबदारी माझ्यावर आहे. तिचा पती कोण हे मला माहित नाही.
मी त्याला पाहिलेले नाही. हादियाने कॉलेजमध्ये प्रवेश घेतला तेव्हा तिचे पालक सोबत आले होते. त्यामुळे त्यांना मी ओळखतो. आता येथे तिला कोणी भेटायला आले तर मी स्वत: किवा कॉलेजचा कोणीतरी अधिकारी तेथे हजर राहील.

Web Title:  Still, I am not free, my husband expressed my love for me

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.