अब भी जलता शहर बचाया जा सकता है
By Admin | Updated: April 17, 2017 01:52 IST2017-04-17T01:52:08+5:302017-04-17T01:52:08+5:30
राजौरी गार्डन येथील पोटनिवडणुकीत आम आदमी पार्टीच्या झालेल्या पराभवानंतर पक्षाचे नेते डॉ. कुमार विश्वास यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

अब भी जलता शहर बचाया जा सकता है
नवी दिल्ली : राजौरी गार्डन येथील पोटनिवडणुकीत आम आदमी पार्टीच्या झालेल्या पराभवानंतर पक्षाचे नेते डॉ. कुमार विश्वास यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केल्याचे दिसून येत आहे. टिष्ट्वटरवर कुमार विश्वास यांनी १३ मिनिटांचा एक व्हिडिओ टाकला असून, अजून वेळ गेलेली नाही, असा संदेश ते यातून देत आहेत.
‘पानी आँख में भरकर लाया जा सकता है
अब भी जलता शहर बचाया जा सकता है’
अशी शायरी करीत कुमार विश्वास पक्षाला काही संदेश देऊ इच्छितात. तथापि, केजरीवाल यांनी मात्र ही टीका खूपच सहज घेतली आहे. याबाबत बोलताना केजरीवाल म्हणाले की, कुमार हे आमच्या कुटुंबाचा एक भाग आहेत. जर त्यांच्या मनात काही असेल तर आम्ही चर्चा करू. मीडिया वेगळ्या पद्धतीने या बातम्या देत आहे. उद्या तुम्ही म्हणाल माझी बायको मला लक्ष्य करीत आहे, अशी कोपरखळीही केजरीवाल यांनी केली. कुमार विश्वास यांनी म्हटले आहे की, येथे विनाकारण जप केला जातो की, मोदी... मोदी, अरविंद... अरविंद, मोदीराज आ गया, योगीराज आ गया; पण आम्ही हे समजू शकत नाही की, हे सर्व थोड्या काळासाठी राहते.