रिक्षाचालकावर चाकूचे वार
By Admin | Updated: April 10, 2015 23:29 IST2015-04-10T23:29:57+5:302015-04-10T23:29:57+5:30
पनवेल : खारघरमध्ये क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून गुरुवारी रिक्षाचालकावर दुचाकीस्वाराने चाकूने वार केले. नितीन केणी (२२) असे त्याचे नाव असून तो यात गंभीर जखमी झाला आहे. खारघर उत्सव चौकातून नितीन केणी हा भारती विद्यापीठ कडे जात होता. मागून येणार्या दुचाकीस्वार गुरुप्रसाद रंगीले ( वय . २४ ) याच्याबरोबर त्याची बाचाबाची झाली. त्यानंतर गुरुप्रसादाने स्वत: जवळ असलेल्या धारदार शस्त्राने नितीन ला भोसकले. त्यात तो गंभीर जखमी झाला. प्रत्यक्षदर्शींनी आरोपीला खारघर पोलिसांच्या ताब्यात दिले. जखमीला नितीनला खारघर मधील हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आरोपीला खारघर पोलिसांनी अटक केली आहे. (प्रतिनिधी)

रिक्षाचालकावर चाकूचे वार
प वेल : खारघरमध्ये क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून गुरुवारी रिक्षाचालकावर दुचाकीस्वाराने चाकूने वार केले. नितीन केणी (२२) असे त्याचे नाव असून तो यात गंभीर जखमी झाला आहे. खारघर उत्सव चौकातून नितीन केणी हा भारती विद्यापीठ कडे जात होता. मागून येणार्या दुचाकीस्वार गुरुप्रसाद रंगीले ( वय . २४ ) याच्याबरोबर त्याची बाचाबाची झाली. त्यानंतर गुरुप्रसादाने स्वत: जवळ असलेल्या धारदार शस्त्राने नितीन ला भोसकले. त्यात तो गंभीर जखमी झाला. प्रत्यक्षदर्शींनी आरोपीला खारघर पोलिसांच्या ताब्यात दिले. जखमीला नितीनला खारघर मधील हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आरोपीला खारघर पोलिसांनी अटक केली आहे. (प्रतिनिधी)