नसबंदी प्रकरणाला वेगळी कलाटणी!
By Admin | Updated: November 16, 2014 01:58 IST2014-11-16T01:58:56+5:302014-11-16T01:58:56+5:30
छत्तीसगडच्या बिलासपूर जिलतील शिबिरात नसबंदी शस्त्रक्रिया केलेल्या 13 महिलांचे मृत्यूप्रकरणाला वेगळी कलाटणी मिळण्याची चिन्हे आहेत़

नसबंदी प्रकरणाला वेगळी कलाटणी!
बिलासपूर : छत्तीसगडच्या बिलासपूर जिलतील शिबिरात नसबंदी शस्त्रक्रिया केलेल्या 13 महिलांचे मृत्यूप्रकरणाला वेगळी कलाटणी मिळण्याची चिन्हे आहेत़ नसबंदी शस्त्रक्रियेनंतर या महिलांना देण्यात आलेल्या औषधात उंदरांना मारण्यात येणा:या विषाचे अंश सापडले आहेत़
बिलासपूर जिलचे मुख्य प्रशासकीय अधिकारी सिद्धार्थ परदेशी यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना ही माहिती दिली़ रुग्णांना देण्यात आलेल्या सिप्रोसिन या अॅण्टिबायोटिक गोळ्यांच्या प्राथमिक चाचणीत, ङिांक फॉस्फॉईडचे अंश आढळले आहेत़ उंदरांना मारण्याच्या औषधात ङिांक फॉस्फॉईड वापरले जाते, असे त्यांनी सांगितल़े औषधांमध्ये ङिांक फॉस्फॉईडचे अंश आढळल्यानंतर आम्ही संबंधित औषधांचा पुरवठा करणा:या महावार फार्मास्युटिकल्स या औषध कारखान्यावरही छापा टाकला़ या ठिकाणीही ङिांक फॉस्फॉईड आढळल़े आता ङिांक फॉस्फॉईडचे अंश आढळलेल्या औषधांचे नमुने दिल्ली आणि कोलकात्याच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे, असेही ते म्हणाल़े रुग्णांमध्ये विषबाधेचीच लक्षणोही आढळली आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधल़े
राज्य सरकारने महावार फार्मास्युटिकल्स कंपनीच्या सिप्रोसिन 5क्क् या औषधाच्या दोन लाख गोळ्या जप्त केल्या आहेत़ कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक रमेश महावार आणि त्याच्या मुलास पोलिसांनी अटक केली आह़े (वृत्तसंस्था)
राहुल गांधी यांनी घेतली
पीडित कुटुंबांची भेट
च्बिलासपूर : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी नसबंदी प्रकरणातील पीडित कुटुंबीयांची भेट घेतली़
च्सरकारी शिबिरात नसबंदी केलेल्या 13 महिलांचा मृत्यू झाला असून अद्यापही अनेक महिलांवर उपचार सुरू आहेत़ राहुल गांधी यांनी मृत महिलांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केल़े