शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

स्टीफन हॉकिंगदेखील मानत होते आइन्स्टाइनच्या सिद्धांतापेक्षा वेद आहेत श्रेष्ठ, भाजपा मंत्री हर्षवर्धन यांचा अजब दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2018 09:04 IST

जगाचा निरोप घेतलेल्या स्टीफन हॉकिंग यांच्यासंदर्भात मोदी सरकारमधील मंत्री हर्षवर्धन यांनी विचित्र विधान केले आहे. 

इम्फाळ : विश्वाची उत्पत्ती, कृष्णविवरांसंदर्भात मांडलेले सिद्धान्त व दुर्धर आजारावर मात करून विश्वासाठी संशोधनाचा यज्ञ अखंड चालू ठेवणारे जगप्रख्यात शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी बुधवारी (14 मार्च) केंब्रिज येथे अखेरचा श्वास घेतला आणि ब्रह्मांडच पोरके झाले. जगाचा निरोप घेतलेल्या स्टीफन हॉकिंग यांच्यासंदर्भात मोदी सरकारमधील मंत्री हर्षवर्धन यांनी विचित्र विधान केले आहे. ''अॅल्बर्ट आइन्स्टाइन यांच्या  E=mc² सापेक्षताच्या सिद्धांताच्या तुलनेत वेदांमधील सूत्रं श्रेष्ठ असू शकतात, असे सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी म्हटले होते'', असा अजब गजब दावा हर्षवर्धन यांनी शुक्रवारी केला आहे. 

मणिपूरची राजधानी इम्फाळमध्ये 105 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये संबोधित करताना हर्षवर्धन यांनी हा दावा केला आहे. दरम्यान, यावेळी त्यांनी या माहितीसंबंधी जोडले गेलेल्या स्त्रोतांबाबतचे प्रश्न टाळले 

नेमके काय म्हणाले हर्षवर्धन?''आपण एका प्रख्यात शास्त्रज्ञ आणि ब्रह्मांड विज्ञानी स्टीफन हॉकिंग यांना गमावलं आहे. वेदांमध्ये सूत्रं आइन्स्टाइन यांच्या  E=mc² सिद्धांतापेक्षाही श्रेष्ठ असू शकतात, असे हॉकिंग यांनी ऑन रेकॉर्ड म्हटले आहे.'' विशेष म्हणजे हर्षवर्धन यांच्या भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र  मोदी, मणिपूरच्या राज्यपाल नजमा हेपतुल्ला आणि मुख्यमंत्री एन. वीरेन सिंहदेखील व्यासपीठावर उपस्थित होते. 

पुराव्याची करण्यात आली मागणीदरम्यान, हर्षवर्धन यांनी केलेल्या दाव्याचा पुरावा मागण्यात आला तेव्हा त्यांनी, तुम्ही याबाबतचे स्त्रोत शोधा. वेदांमधील सूत्रं आइन्स्टाइन यांच्या सिद्धांतापेक्षा श्रेष्ठ असू शकतात, असे स्टीफन यांनी म्हटल्याचा रेकॉर्ड आहे. तुम्ही लोकांनीही यावर थोडं संशोधन करावं. मात्र, स्टीफन हॉकिंग यांनी भारतीय वेदांसंबंधी कोणतेही विधान केलेल्याचा ठोस पुरावा आढळलेला नाही. स्टीफन हॉकिंग आणि भारतीय वेद यासंबंधी गुगलवर माहिती शोधण्यात आली त्यावेळेस ब-याच लिंक समोर आल्या. यावेळी Institute of Scientific Research on Vedas ही लिंकदेखील पर्यायांमध्ये समोर आली. यात डॉ. शिवरामबाबू यांनी लिहिलेल्या वैदिक आणि वैज्ञानिक पुस्तकासंदर्भात स्टीफन हॉकिंग यांनी सांगितले होते की, यामध्ये एखादा असे सूत्र असू शकते जो आइन्स्टाइन यांच्या सिद्धांतापेक्षा चांगले असेल''. 

टॅग्स :Stephen Hawkingस्टीफन हॉकिंगBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी