शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
3
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
5
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
6
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
7
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
8
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
9
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
10
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
11
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
12
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
13
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
14
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
15
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
16
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
17
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
18
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
19
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
20
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!

काश्मीरमधील परिस्थिती निवळण्यासाठी सरकारकडून हालचाली, उचलणार हे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2019 8:56 AM

कलम 370 रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर काश्मीरमधील परिस्थिती नियंत्रणात राहावी यासाठी अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

नवी दिल्ली - कलम 370 रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर काश्मीरमधील परिस्थिती नियंत्रणात राहावी यासाठी अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दरम्यान, काश्मीरमधील परिस्थिती निवळण्यासाठी केंद्र सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी नजरकैदेत असलेल्या ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती यांच्यासारख्या स्थानिक काश्मिरी नेत्यांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरू करण्यात आले आहेत. त्याबरोबरच काश्मीरप्रश्नी सर्वपक्षीय बैठक बोलावून तेथील परिस्थितीची माहिती देण्याचा विचारही सरकराने सुरू केला आहे. सध्या परदेश दौऱ्यावर असलेले नरेंद्र मोदी मायदेशात परतल्यानंतर होणाऱ्या बैठकीत याबाबत निर्णय होऊ शकतो. 5 ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यापासून काश्मीर खोऱ्यात अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तेव्हापासून खोऱ्यात संचारबंदीसारखी परिस्थिती आहे.  दरम्यान, 15 ऑगस्टपासून खोऱ्यातील परिस्थिती निवळण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी श्रीनगरमध्ये नजरकैदेत असणाऱ्या काही बड्या नेत्यांशी संपर्क साधला आहे. ओमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांच्याशी चर्चा करून त्यांना परिस्थितीची कल्पना दिली आहे. सूत्रांच्या सांगण्यानुसार या नेत्यांची सुटका करण्याच्या प्रक्रियेलाही गती आली आहे. सरकार त्यासाठी अन्य विरोधी नेत्यांना विश्वासात घेणार असून, त्यासाठी दिल्ली किंवा श्रीनगरमध्ये सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात येण्याची शक्यता आहे. काश्मीरमधील परिस्थिती सामान्य असल्याची ग्वाही सरकार आणि विरोधी पक्षांनी मिळून जगाला द्यावी, अशी सरकारची अपेक्षा आहे.  दरम्यान, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांच्या नेत्यांना सुरक्षा यंत्रणांनी शनिवारी दुपारी श्रीनगर विमानतळारूनच दिल्लीला पाठविले. काश्मीरमधील परिस्थिती पाहण्यासाठी व स्थानिक लोकांशी संवाद साधण्यासाठी हे नेते निघाले होते. काश्मीरमध्ये सारे आलबेल आहे, असे केंद्र सरकार सांगत असले, तरी परिस्थिती चांगली नाही आणि म्हणूनच आम्हाला श्रीनगरमध्ये मज्जाव केला, अशी टीका राहुल गांधी यांनी दिल्लीत केली. काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद म्हणाले की, काश्मीरमधील स्थिती अतिशय वाईट आहे, असे आम्हाला विमानातील प्रवाशांनीच सांगितले, पण केंद्र सरकार हे देशातील जनतेपासून लपवू पाहत आहे. राजकीय पक्षांच्या नेत्यांची ही गळचेपी असल्याचा आरोप सीताराम येचुरी यांनी केला. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370Central Governmentकेंद्र सरकार