शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
2
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
3
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
4
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
6
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
7
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
8
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
9
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
10
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
11
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
12
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
13
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
14
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
15
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
16
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
17
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
19
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
20
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'

Subramanian Swamy : "परकीय चलन गंगाजळीत सातत्याने घट होतेय", RBI च्या आकडेवारीवरून सुब्रमण्यम स्वामींचा नरेंद्र मोदींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2022 19:04 IST

Subramanian Swamy : याआधी सुद्धा सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदी सरकारच्या आर्थिक धोरणावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आकडेवारीचा संदर्भ देत 2021 पासून परकीय चलनाच्या गंगाजळीत सातत्याने घट होत आहे. हे केवळ कोरोना महामारीमुळे होऊ शकत नाही, असे म्हणत सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. 

याआधी सुद्धा सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदी सरकारच्या आर्थिक धोरणावर प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान, अलीकडच्या काळात भाजपचे सुब्रमण्यम स्वामी अतिशय आक्रमक झाले असून विविध मुद्द्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत आहेत. याआधी सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांच्या बहाण्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. मंत्री प्रल्हाद पटेल यांच्या फाईलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सही का करत नाहीत, असा सवाल सुब्रमण्यम स्वामी यांनी केला होता.

चार वर्षांपासून ही फाइल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डेस्कवर पडून असल्याचा दावा सुब्रमण्यम स्वामी यांनी केला होता. याचबरोबर,पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणतेही कारण नसताना प्रल्हाद पटेल यांचे मंत्रालय बदलले आणि डोवाल यांनी फोन टॅपिंगसाठी त्यांच्या पत्नीच्या फोनमध्ये पेगासस टाकल्याचा मोठा आरोप सुब्रमण्यम स्वामी यांनी केला होता. दरम्यान, सुब्रमण्यम स्वामी कोणत्या-ना- कोणत्या कारणाने भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत आहेत. मात्र, सुब्रमण्यम स्वामी यांच्या आरोपांवर भाजपकडून कोणतीही प्रतिक्रिया दिली जात नाही.

परकीय चलनाचा साठा चार आठवड्यांनंतर वाढलापरकीय चलनाच्या साठ्याबद्दल बोलायचे झाल्यास, देशांतर्गत पोर्टफोलिओ गुंतवणूकदार पुन्हा एकदा भारतीय बाजाराकडे वळले आहेत, ज्यानंतर 29 जुलै रोजी संपलेल्या आठवड्यात भारताच्या परकीय चलनाच्या साठ्यात 2.4 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. याआधी, सलग चार आठवडे त्यात घट झाली होती. आरबीआयच्या आकडेवारीनुसार, 29 जुलै रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठा 573.875 अब्ज डॉलर होता. त्याचवेळी, 15 जुलै रोजी संपलेल्या आठवड्यात, परकीय चलनाच्या साठ्यात 7.541 अब्ज डॉलरची घट झाली आहे. शिवाय, 22 जुलै रोजी संपलेल्या आठवड्यात ते 571.5 अब्ज डॉलर होते.

टॅग्स :Subramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक