शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

प्रसिद्धीपासून दूर राहा, ती नशा तुम्हाला संकटात टाकेल; नव्या खासदारांना मोदींचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2019 19:39 IST

जनता आणि स्वत: यामध्ये अंतर ठेऊ नका. अहंकारापासून दूर ठेवा असंही नरेंद्र मोदींनी सांगितले. 

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनेक नव्या चेहऱ्यांना खासदारकीची संधी मिळाली. लोकसभेत पहिल्यांदा खासदार झालेल्यांनी प्रसिद्धीच्या मोहापासून दूर राहा. लालकृष्ण अडवाणी नेहमी सांगायचे की, छापणे आणि दिसणे यापासून लांब राहिला तर ते तुमच्यासाठी फायद्याचं आहे. त्यामुळे टीव्हीवर दिसणे आणि पेपरमध्ये छापून येणं दूर ठेवा असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन खासदारांना दिला आहे. 

अनेक प्रस्थापितांना पराभूत करुन तुम्ही आला आहात त्याचा घमंड ठेवू नका, तुम्ही मोदींमुळे निवडून आला नाही तर जनतेच्या आदेशामुळे निवडून आला आहे. जनतेच्या मतांचे सन्मान करा. जनता आणि स्वत: यामध्ये अंतर ठेऊ नका. अहंकारापासून दूर ठेवा असंही नरेंद्र मोदींनी सांगितले. 

शिफारशींवर कर्मचारी नेमू नकादिल्लीत अशी व्यवस्था आहे जी तुम्हाला बर्बाद करेल. तुमचं काम करण्यासाठी तुमच्या मतदारसंघातील योग्य उमेदवाराला संधी द्या. जुन्या खासदारांनी केलेल्या शिफारशींची माणसं भरु नका. तुमचा विश्वास ज्या माणसांवर आहे त्या माणसाला जबाबदारी द्या असंही नरेंद्र मोदींनी सांगितले.   सामान्य माणसांशी तुम्ही नातं जोडा. मनोहर पर्रिकर यांनी आयुष्यभर हेच केलं. व्हीआयपी कल्चरपासून जितकं लांब राहता येईल राहा. 

माध्यमातील अफवांवर विश्वास ठेऊ नकाअजून कोण निवडून आलं आहे, कोण पडलं आहे याची यादी माझ्याकडे आली नाही. पण देशात अनेक नरेंद्र मोदी जन्माला आले, त्यांनी मंत्रिमंडळ पण जाहीर केलं. ज्या लोकांची नावं चर्चेत आहेत त्यांना स्वप्न पडली आहेत. मला कोणतं खातं मिळणार याची लालसा बाळगू नका, सरकारमध्ये कोण मंत्री होणार हे मिडीया ठरवणार नाही त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका. ज्यांची नावं आहेत त्यांनी सांगा माझं नावं काढून टाका. ज्यांना मंत्रिमंडळ बनविण्याचा अधिकार आहे तेच हे काम करतील तुम्ही करु नका असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा नेत्यांना लगावला. 

गांधी, दिनदयाळ, लोहिया यांच्या विचारांवर चला महात्मा गांधी, पंडीत दिनदयाळ उपाध्यय, राममनोहर लोहिया या तीन महापुरुषांचे विचार घेऊन पुढे चला, हे विचार तुम्हाला पुढे आणतील. आज राजकारणात या तीन विचारधारेची माणसं वर्चस्व करतात. मग ती माणसं दुसऱ्या राजकीय पक्षातही का असेना. पण या महापुरुषांचे विचार त्यांना प्रगल्भ करतात. 

बाबासाहेबांनी तपस्या करुन केलेलं संविधान सर्वोच्च डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली आहे त्याच्या कसोटीत राहून काम केलं तर कोणत्याही संकटाला तुम्हाला सामोरं जावं लागणार नाही.  संविधानाची साक्ष ठेऊन संकल्प करा, या देशातील सर्व घटकांना न्याय देण्याचं काम करुन त्यांना समाजात पुढे आणण्याचं काम करा. समाजातील जातीभेद दूर करा. सर्वांना पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आपली आहे. सबका साथ, सबका विकास आणि आता सबका विश्वास हा आपला मंत्र आहे.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालNarendra Modiनरेंद्र मोदीMember of parliamentखासदार