मोटार विमा प्रीमियममध्ये राज्याचा सर्वाधिक वाटा
By Admin | Updated: December 10, 2014 23:39 IST2014-12-10T23:39:34+5:302014-12-10T23:39:34+5:30
मोटार इन्शुरन्स प्रीमियममध्ये महाराष्ट्राने आपला सर्वाधिक, म्हणजेच 16 टक्के वाटा राखला आहे.

मोटार विमा प्रीमियममध्ये राज्याचा सर्वाधिक वाटा
नवी दिल्ली : मोटार इन्शुरन्स प्रीमियममध्ये महाराष्ट्राने आपला सर्वाधिक, म्हणजेच 16 टक्के वाटा राखला आहे. 2क्12-13साठी देशभरातील सर्व राज्यांतून एकूण 17 हजार 98 कोटी रुपयांचा प्रिमीयम जमा झाला. महाराष्ट्राने या काळात सर्वाधिक वाटा राखला असतानाच गुजरातने 2क्क्9-1क् ते 2क्12-13 या कालावधीत वार्षिक वृद्धीचा दर सर्वाधिक, म्हणजेच 123 टक्के राखून विक्रम केला आहे. असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने (असोचेम) याबाबतचा आपला अहवाल नुकताच जारी केला असून, त्यात ही आकडेवारी देण्यात आली आहे.
गुजरात राज्यातून 2क्क्9-1क्मध्ये जमा झालेला एकूण प्रिमीयम 618 कोटी रुपये होता. 2क्12-13मध्ये तो वाढून दुपटीहून अधिक म्हणजे 1 हजार 379 कोटी रुपये झाल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते.
देशभरातून जमा झालेल्या एकूण प्रिमीयममध्ये महाराष्ट्राखालोखाल तमिळनाडूचा क्रमांक लागतो. या राज्याचा वाटा 8 टक्क्यांचा असून, त्यानंतर गुजरात, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या राज्यांचा पहिल्या 5 क्रमांकांत समावेश आहे. या राज्यांनी प्रिमीयममध्ये अनुक्रमे 8 टक्के, 7.7 आणि 6.9 टक्के वाटा राखला आहे.
वार्षिक वृद्धीदरात बिहारचा (104 टक्के) दुसरा क्रमांक आहे. महाराष्ट्राचा या बाबतीत तिसरा क्रमांक लागतो. राज्याचा प्रिमीयमवाढीचा दर 96 टक्के राहिला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
4देशात पायाभूत सुविधांचा चांगला विकास होत आहे. स्वाभाविकपणो वाहन उद्योगात नवनवीन मॉडेल येत आहेत. त्यामुळे वाहन विमाक्षेत्रत वाढ होत असल्याचे असोचेमचे सरचिटणीस डी. एस. रावत यांनी सांगितले.