मारले जाणारे अतिरेकी हे आपलेच भाऊ, पीडीपी आमदार एजाज मीर यांचे विधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 01:26 IST2018-01-12T01:25:39+5:302018-01-12T01:26:08+5:30
काश्मीरमधील दहशतवादी ‘शहीद’ होतात, ते आपल्या भावांसारखेच आहेत. त्यांचा मृत्यू साजरा करणे चुकीचे आहे, असे वक्तव्य काश्मीरमधील पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टी (पीडीपी) या सत्ताधारी पक्षाचे आमदार एजाज अहमद मीर यांनी केले असून, त्यांच्यावर टीका सुरू झाली आहे.

मारले जाणारे अतिरेकी हे आपलेच भाऊ, पीडीपी आमदार एजाज मीर यांचे विधान
जम्मू : काश्मीरमधील दहशतवादी ‘शहीद’ होतात, ते आपल्या भावांसारखेच आहेत. त्यांचा मृत्यू साजरा करणे चुकीचे आहे, असे वक्तव्य काश्मीरमधील पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टी (पीडीपी) या सत्ताधारी पक्षाचे आमदार एजाज अहमद मीर यांनी केले असून, त्यांच्यावर टीका सुरू झाली आहे.
आ. एजाज अहमद मीर यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना हे विधान केले. दहशतवाद्यांपैकी काही जण अल्पवयीन असून आपण नेमके काय करत आहोत, हे त्यांना कळतही नाही. त्यामुळे आपण दहशतवाद्यांचा मृत्यू साजरा करता कामा नये, जवान शहीद झाल्यावर त्यांच्या कुटुंबीयांविषयी जशी सहानुभूती व्यक्त करतो, तशी सहानुभूती दहशतवादी मारल्या गेल्यानंतरही व्यक्त केली पाहिजे, अशी मुक्ताफळेही त्यांनी गायली.
आ. मीर यांना मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी समज द्यावी, अशी मागणी भाजपाने केली आहे. (वृत्तसंस्था)