राज्य-थोडक्यात-नागपूर

By Admin | Updated: August 3, 2015 22:26 IST2015-08-03T22:26:37+5:302015-08-03T22:26:37+5:30

तोतया पोलिसांनी दागिने लुटले

State-wise-Nagpur | राज्य-थोडक्यात-नागपूर

राज्य-थोडक्यात-नागपूर

तया पोलिसांनी दागिने लुटले
नागपूर : तोतया पोलिसांनी महिलेचे १ लाख, ६० हजारांचे दागिने लंपास केले. अंबाझरी पोलिसांच्या हद्दीत ही घटना घडली. गौरी रवींद्र महाजन (६५, रा.अयोध्या कॉम्प्लेक्स रामनगर) या शनिवारी सकाळी ९.४५ च्या सुमारास अंबाझरी हद्दीत हिल रोडने जात होत्या. कर्नाटक संघ हॉलच्या समोर दोन आरोपींनी त्यांना रोखले. आम्ही पोलीस आहोत, अशी बतावणी करून त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना सोन्याचे दागिने घालून फिरण्यास मनाई करण्यात आली असल्याचे सांगून महाजन यांच्या हातातील सोन्याच्या दोन बांगड्या काढून घेतल्या.

ठाणेदाराने तीनपट वाढविला होता हप्ता
नागपूर : भद्रावतीचे ठाणेदार अशोक साखरकर एपीआयसह लाच घेताना सापडल्याने पोलीस विभाग हादरला आहे. अवैध वाहतुकीच्या मासिक हप्त्याची रक्कम १० हजाराहून ३५ हजार रुपये केल्यामुळे साखरकरला तुरुंगात जाण्याची वेळ आली. रेती वाहतूक करणारा आकाश वानखेडे यांच्या तक्रारीवरून एसीबीने साखरकर आणि त्याचा सहायक निरीक्षक शंकर चौधरी याला २० हजार रुपयाची लाच घेतांना पकडले आहे.

Web Title: State-wise-Nagpur