राज्य-थोडक्यात-विदर्भ

By Admin | Updated: February 6, 2015 22:35 IST2015-02-06T22:35:17+5:302015-02-06T22:35:17+5:30

राज्य-थोडक्यात-विदर्भ

State-specific-Vidarbha | राज्य-थोडक्यात-विदर्भ

राज्य-थोडक्यात-विदर्भ

ज्य-थोडक्यात-विदर्भ


सिंचन प्रकल्पांबाबत राज्य सरकार उदासीन
गडचिरोली : पेसा कायद्याची अंमलबजावणी लागू झाल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात अनुसूचित क्षेत्रात आता सिंचन प्रकल्प, उपसा सिंचन योजना यांच्या कामाला बंधन घालण्यात आले आहे. राज्यपालांनी सरकारला तसे निर्देश दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात सिंचन प्रकल्पांची कामे रखडणार आहेत. राज्य सरकार याबाबत कोणतीही भूमिका घेण्यास तयार नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

सवंगणी केलेल्या तुरीची चोरी
वर्धा - शेतात सवंगणी करून ठेवलेल्या तुरीच्या पेंड्या अज्ञात चोराने लंपास केल्या. ही घटना बुधवारी उघडकीस आल्यानंतर शोभा उगले यांनी अल्लीपूर पोलिसात याबबत तक्रार दिली. टाकळी(द.) शिवारात सदर घटना घडली असून पुढील तपास सुरू आहे. असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

बैलबंडी उलटून शेतकऱ्याचा मृत्यू
आवळगाव (चंद्रपूर): येथून जवळच असलेल्या हळदा येथे बैलबंडी उलटून शेतमजूराचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी ९ वाजता घडली. डोमाजी बालाजी लोणारे (५५) असे शेतमजुराचे नाव आहे. डोमाजी शेतात सरपन आणण्यासाठी गेला होता. परत येत असताना बैलबंडी उलटली. यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दरम्यान शेतात त्यांचा भाऊ गेला असता ही घटना उघडकीस आली.

दारू विक्रेत्यांना अटक
गोंदिया: बुधवारी पोलिसांनी दोन दारूविक्रेत्यांना अटक केली. रामनाथ भोगू मिश्रा (३८) रा.बोंडगावदेवी यांच्याकडून १४ देशी दारूचे पव्वे, तर मुनेश्वर टिकाराम बरीयेकर (३१) याच्याकडून १२ नग देशी दारूचे पव्वे जप्त करण्यात आले. सदर आरोपींवर मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

स्वाईन फ्लू बळीची संख्या १४
नागपूर : तापमानात वाढ होत असतानाही स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. स्वाईन फ्लू संशयित म्हणून उपचारासाठी दाखल झालेल्या एका महिलेचा मेडिकलच्या अपघात विभागातच मृत्यू झाला. गुरुवारी या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यासोबत आणखी एका महिलेला हा आजार असल्याचे निष्पन्न झाले आहे. आतापर्यंत बळींची संख्या १४ झाली असून, पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४२ झाली आहे.

३२ लाखांवरून १२ लाखांवर आला महसूल
नागपूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) वायु पथकाला महिन्याकाठी विविध दंडाच्या सहायातून ३२ लाखांचे लक्ष्य देण्यात आले आहे. परंतु आरटीओतील सहायक मोटार वाहन निरीक्षकांवर दलालबंदीची जबाबदारी देण्यात आली आहे. परिणामी दरमहा ३२ लाखांचा महसूल जानेवारी महिन्यात १२ लाखांवर आला आहे.

Web Title: State-specific-Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.