धनगर समाज आंदोलनाचे हत्यार उपसणार धनगर सेवा संघाचे राज्य सचिव टिक्कल यांची माहिती
By Admin | Updated: December 22, 2014 23:11 IST2014-12-22T23:11:57+5:302014-12-22T23:11:57+5:30
कोपरगाव : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारप्रमाणेच भाजपा-शिवसेनेचे सरकार धनगर समाजाच्या भावनांशी खेळत आहे़ समाजाला आरक्षण जाहीर करण्याची वाट केवळ प्रजासत्ताक दिनापर्यंत पाहिली जाईल, त्यानंतर आंदोलनांचे हत्यार राज्यभर उपसले जाईल, अशी माहिती, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर क्षत्रिय धनगर सेवा संघाचे राज्य सचिव रमेश टिक्कल व राज्य युवा अध्यक्ष किरण थोरात यांनी दिली़

धनगर समाज आंदोलनाचे हत्यार उपसणार धनगर सेवा संघाचे राज्य सचिव टिक्कल यांची माहिती
क परगाव : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारप्रमाणेच भाजपा-शिवसेनेचे सरकार धनगर समाजाच्या भावनांशी खेळत आहे़ समाजाला आरक्षण जाहीर करण्याची वाट केवळ प्रजासत्ताक दिनापर्यंत पाहिली जाईल, त्यानंतर आंदोलनांचे हत्यार राज्यभर उपसले जाईल, अशी माहिती, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर क्षत्रिय धनगर सेवा संघाचे राज्य सचिव रमेश टिक्कल व राज्य युवा अध्यक्ष किरण थोरात यांनी दिली़धनगर समाजाच्या आरक्षणावरून संसदेतील हिवाळी अधिवेशनात गोंधळ झाला़ परंतु ज्या धनगर समाजाने आम्हाला आरक्षण मिळेल या आशेवर भाजपा व शिवसेनेच्या आमदारांना निवडून दिले़ तेच विधानसभेतील वादात गप्प बसले़ धनगर समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात अनेक समित्या नेमण्यात आल्या़ त्या पैकी रेणके आयोगानुसार व केंद्राच्या सुचीनुसार धनगर समाज हा आदिवासीच आहे़ तरीही खडसे पाटलांनी पुन्हा नवीन समिती नेमणार म्हणून घोषणा केली़ परत धनगर समाजाचा भ्रमनिरास केला़ समिती पाच वर्षे काम करणार व नंतर ऐन निवडणुकीदरम्यान भाजपा सरकार धनगरांना आश्वासन देणार हे समजायला धनगर समाज खुळा राहिलेला नाही़ धनगर समाजाकडून प्रजासत्ताक दिनापर्यंत सरकारच्या निर्णयाची वाट आम्ही पाहणार आहोत़ त्यानंतर मोर्चे, आंदोलन करू, असा इशाराही राज्य सचिव रमेश टिक्कल व किरण थोरात यांनी दिला आहे़ (प्रतिनिधी)