ंंदाभोलकर हत्येच्या सीबीआय तपासात राज्याचे अधिकारीही सहभागी
By Admin | Updated: August 20, 2015 22:10 IST2015-08-20T22:10:00+5:302015-08-20T22:10:00+5:30
ंंंंंडॉ.दाभोलकर हत्येच्या

ंंदाभोलकर हत्येच्या सीबीआय तपासात राज्याचे अधिकारीही सहभागी
ं ंंंडॉ.दाभोलकर हत्येच्यातपासासाठी राज्याकडूनपोलीस अधिकारीमुंबई - : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रभावी तपासासाठी केंद्रीय गुन्हे अन्वेषण पथकाला (सीबीआय) सहाय्य करण्यासाठी सरकारने पोलीस दलातून काही अधिकारी दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.डॉ.दाभोलकर यांच्या हत्येला आज दोन वर्षे पूर्ण झाली पण अजूनही आरोपी पकडले गेलेले नाहीत. आधी राज्य पोलिसांनी तपास केला नंतर तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला. या हत्येच्या तपासकार्यात पूर्वी काम केलेल्या पोलीस अधिकार्यांच्या सहाय्याची मागणी सीबीआयने राज्याच्या पोलीस विभागाकडे नुकतीच केली होती. त्यानुसार तपासाचा वेग वाढून गुन्हेगारांना लवकर अटक व्हावी यादृष्टीने मुख्यमंत्र्यांनी त्यास मान्यता दिली आहे. हे अधिकारी तीन महिन्यांच्या कालावधीसाठी किंवा तपास पूर्ण होईपर्यंत सीबीआयला सहाय्य करतील. (विशेष प्रतिनिधी)------------------------------ पुण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त जी.एस. मडगुळकर, नागपूरचे पोलीस निरीक्षक सतीश देवरे, यवतमाळचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत घोडके, पुण्याचे पोलीस निरीक्षक दिनकर कदम आणि सहायक पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण हे सीबीआयला सहाय्य करतील. ------------------------------