शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

राज्याची खबरबात - ओडिशात बंडखोर, आयाराम-गयाराम यांचा फटका बसणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2024 06:37 IST

बीजेडी आणि भाजपमध्ये तुल्यबळ लढत

प्रसाद श. कुलकर्णीओडिशामध्ये बंडखोर, आयाराम-गयाराम यांचा सामना पक्षांना करावा लागत आहे. मुख्य पक्ष बिजू जनता दल आणि विरोधी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांना बंडखोरांचा सामना करावा लागत असून, पक्षांतर्गत नाराजीलाही तोंड द्यावे लागत आहे. ओडिशामध्ये विधानसभा आणि लोकसभा असे दोन्हीचे पडघम वाजले आहेत. या ठिकाणी वर्चस्व आहे ते नवीन पटनाईक यांच्या बिजू जनता दलाचे (बीजेडी). दुसऱ्या क्रमांकाला भारतीय जनता पक्ष आहे. काँग्रेस तिसऱ्या क्रमांकाचा या ठिकाणी पक्ष आहे. या ठिकाणी खरी लढत आहे, बीजेडी आणि भाजपमध्येच. या दोन्ही पक्षांमध्ये युतीची चर्चा सुरू होती. पण, त्याला यश आले नाही. निवडणुकीतील मुख्य चेहरे पुन्हा पटनाईक आणि नरेंद्र मोदी हेच राहणार आहेत.

आयाराम-गयाराम आणि नाराज उमेदवारांचा फटका या निवडणुकीतही पक्षांना बसणार आहे. बालासोर, बेरहामपूर, कटक यांसारखे लोकसभा मतदारसंघात ती चुरस पाहायला मिळेल. भुवनेश्वर येथून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश राउतराय यांचा मुलगा मनमथ यांना बीजेडीने उमेदवारी दिली आहे. 

२०१९च्या निवडणुकांतील स्थितीपक्ष    विधानसभा     लोकसभा    निकाल    निकालबिजू जनता दल    ११३    १२भारतीय जनता पक्ष    २३    ८काँग्रेस    ९    १एकूण जागा    १४७    २१

तीन ठिकाणी ज्येष्ठ नेत्यांची मुलेओडिशामध्ये काँग्रेस नेते सुरेश राउतराय यांचा मुलगा मनमथ बीजेडीकडून, चिंतामणी सामंतराय यांची दोन मुले, मनोरंजन सामंतराय भाजपकडून आणि दुसरा मुलगा रवींद्रनाथ सामंतराय काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत.तसेच भाजपचे विजय मोहापात्रा यांचा मुलगा अरविंद मोहापात्रा याला बीजेडीने उमेदवारी दिली आहे. या मुलांचे वडील त्यामुळे अडचणीत आले आहेत. ओडिशा प्रदेश काँग्रेस समितीने नुकतीच सुरेश राउतराय यांना याबाबत नोटीस पाठविली आहे.

बंदोबस्त वाढला, ३५ कंपन्या दाखल nनक्षलग्रस्त भागामध्ये केंद्रीय पोलिस दले जास्त द्यावीत, अशी मागणी राज्य पोलिसांनी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे केली आहे. ओडिशामध्ये दहा जिल्ह्यांत नक्षलवाद्यांचा प्रभाव आहे. nकेंद्राने आतापर्यंत केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) आणि सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) यांच्या ३५ कंपन्या आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) पाच कंपन्या राज्यासाठी दिल्या आहेत. 

टॅग्स :OdishaओदिशाBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४lok sabhaलोकसभा