भारतातील 'या' राज्यात आजपासून पेट्रोल-डिझेल मिळणार 2.5 रुपयांनी स्वस्त 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 09:15 AM2018-11-21T09:15:00+5:302018-11-21T10:05:36+5:30

झारखंड मंत्रिमंडळाने राज्यातील पेट्रोल-डिझेलवरील 2.5 रुपये वॅट कमी करण्याच्या निर्णयाला मंगळवारी (20 नोव्हेंबर) आपली मंजूरी दिली आहे. 

this state of india petrol and diesel will get 25 rupees cheaper from today | भारतातील 'या' राज्यात आजपासून पेट्रोल-डिझेल मिळणार 2.5 रुपयांनी स्वस्त 

भारतातील 'या' राज्यात आजपासून पेट्रोल-डिझेल मिळणार 2.5 रुपयांनी स्वस्त 

Next
ठळक मुद्देझारखंड मंत्रिमंडळाने राज्यातील पेट्रोल-डिझेलवरील 2.5 रुपये वॅट घटवण्याच्या सरकारच्या निर्णयाला आपली संमती दर्शवली आहे. आजपासून पेट्रोल-डिझेल 2.5 रुपयांनी स्वस्त मिळणार आहे.झारखंडचे  मुख्यमंत्री रघुवर दास यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

रांची - गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत आहे. राजधानी नवी दिल्लीतही प्रति लिटर पेट्रोलसाठी 76.38 रुपये, तर प्रति लिटर डिझेलसाठी 71.27 रुपये मोजावे लागत आहेत. मात्र भारतातील एका राज्यात आजपासून पेट्रोल-डिझेल 2.5 रुपयांनी स्वस्त मिळणार आहे. झारखंड मंत्रिमंडळाने राज्यातील पेट्रोल-डिझेलवरील 2.5 रुपये वॅट कमी करण्याच्या निर्णयाला मंगळवारी (20 नोव्हेंबर) आपली मंजूरी दिली आहे. 

झारखंडचे  मुख्यमंत्री रघुवर दास यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळाने झारखंड मूल्यवर्धित कर अधिनियम, 2005 च्या संलग्न अनुसूचीचे संशोधन करून पेट्रोल आणि डिझेलवर असलेल्या वॅट 2.5 रुपयांनी कमी करण्याला संमती दिली आहे. मागील दोन आठवड्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने घट होत आहे.

इंधनाची किंमत डॉलरचा दर व आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे भाव यावर निश्चित होते. दोन महिन्यांपासून कच्चे तेल महाग झाले होते. पण आता ते काही प्रमाणात स्वस्त झालं आहे. 6 ऑक्टोबरला पाच राज्यांमधील निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या. निवडणुकांचा प्रचार ऐन रंगात असतानाच, तेल कंपन्यांनी 18 ऑक्टोबरपासून पेट्रोल-डिझेलची दरकपात सुरू केली आहे. यावरून सरकारी तेल कंपन्यांची निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून दरकपात केल्याचे दिसून येत आहे. निवडणुका संपताच डिसेंबरात इंधनाचे दर भडकण्याची भीती आहे.

Web Title: this state of india petrol and diesel will get 25 rupees cheaper from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.