राज्य/ महत्वाचे/ कोल्हापूर
By Admin | Updated: August 19, 2015 22:27 IST2015-08-19T22:27:34+5:302015-08-19T22:27:34+5:30
औरवाडमध्ये कुपोषित बालक आढळले

राज्य/ महत्वाचे/ कोल्हापूर
औ वाडमध्ये कुपोषित बालक आढळलेकोल्हापूर : औरवाड (ता. शिरोळ) येथे कुपोषित बालक आढळून आल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. अमोल मनोहर ऐवाळे (९, मूळ रा. कमलापूर, ता. सांगोला) असे त्याचे नाव आहे. चुलत्याचे दुर्लक्ष व मानसिक, शारीरिक त्रास देत असल्यामुळे कुपोषित झाल्याने गावातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी अमोलला कुरुंदवाड पोलीस ठाण्यात हजर करून त्याची चुलत्याच्या बंधनातून सुटका केली.रेल्वे कर्मचार्याचा मुलगा रेल्वेखाली ठारसांगली : मिरजेतील माणिकनगरजवळ मंजुनाथ मल्लाप्पा (३०) या रेल्वे कर्मचार्याच्या मुलाचा रेल्वेखाली सापडून मृत्यू झाला. प्रेम प्रकरणातून मंजुनाथ याने आत्महत्या केल्याची चर्चा सुरू होती.विनयभंगप्रकरणी युवकावर गुन्हासातारा : विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी येथील गजानन हौसिंग सोसायटीत राहणार्या युवकावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आशिष अविनाश रविढोणे असे गुन्हा नोंद झालेल्या युवकाचे नाव आहे.काँग्रेसविरोधी शिवशाही गट फुटीच्या उंबरठ्यावरसिंधुदुर्ग : सावंतवाडी पंचायत समितीत सत्ताधारी काँग्रेस पक्षाची खुर्ची डळमळीत होणार असे वाटत असतानाच काँग्रेसच्या विरोधात नव्याने स्थापन झालेला शिवशाही गट आता फुटीच्या उंबरठ्यावर असून, या गटातील दोन सदस्यांनी रविवारी रात्री काँग्रेस नेते नारायण राणे यांची भेट घेतली.