राज्य- महत्वाचे- कोल्हापूर
By Admin | Updated: November 1, 2015 00:27 IST2015-11-01T00:27:02+5:302015-11-01T00:27:02+5:30
शिये फाटा येथून डंपर चोरला

राज्य- महत्वाचे- कोल्हापूर
श ये फाटा येथून डंपर चोरलाकोल्हापूर : शिये फाटा येथील राजीव गांधी वसाहतीमधून दारात लावलेला सुमारे पाच लाख रुपये किमतीचा डंपर चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना घडली. अशोक विटकर यांच्या मालकीचा हा डंपर चोरट्यांनी पळविला.चोरट्यास रंगेहात पकडलेसांगली : बहाद्दूरवाडी (ता. वाळवा) येथील मरिआई मंदिरातील पितळेचा हत्ती पळविणार्या चोरट्यास रंगेहात पकडून पोलिसांच्या हवाली केले. बाळासाहेब पांडुरंग सूर्यवंशी (रा. शहापूर, इचलकरंजी) याने ७ किलोचा व तीन हजार पाचशे रुपयांचा हा हत्ती पळविला. मात्र, तो पळून जाताना शहाजी माने, रवींद्र घोरपडे यांनी त्याला रंगेहात पकडले. डॉक्टरविरुद्ध अत्याचाराचा गुन्हालोणंद : येथील डॉ. जयेश रावळ यांनी एका ५७ वर्षे वयाच्या महिलेवर अत्याचार केल्याचा गुन्हा लोणंद पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.